shivsena : एकीकडे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनाला गळती लागली आहे. तर दुसरीकडे असं असलं तरी देखील शिवसेनेच्या गोटातून एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. भाजपचे माजी मंत्री लवकरच शिवसेनेत येणार असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्याने केला आहे.
यामुळे आता भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून अनेकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे शिवसेनेला चांगलीच गळती लागली. याचे धक्के थेट पक्षाला सोसावे लागतं आहे.
तर अशातच एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. भाजपाचे माजी मंत्री संजय देशमुख हे शिवसेनेमध्ये येण्यासाठी इच्छूक असल्याचा दावा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
विनायक राऊत यांनी याबद्दल बोलताना सांगितलं आहे की, शुक्रवारी संजय देशमुख शिवसेना भवनला आले होते. देशमुख यांनी शिवसेनेसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष बाब म्हणजे, देशमुख यांनी यापूर्वी देखील एकदा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
दरम्यान, देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर याचा वाईट परिमाण भाजपला भोगावा लागणार असल्याचं बोललं जातं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय समीकरण बदलताना पाहायला मिळतं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून मोठ्या प्रमाणत पक्षांतर होऊ लागलं आहे.
अशातच आता शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी केलेला हा नवीन दावा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र देशमुख यांच्या शिवसेना प्रवेशाबद्दल अद्याप देशमुख यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. याचबरोबर याबद्दल भाजपकडून देखील यावर प्रतिक्रिया आलेल्या नाहीये.