vasantdada patil granddaughter died | डॉ. मधू प्रकाश पाटील यांचं काल ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नात होत्या. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर आणि कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मधू पाटील या काँग्रेसच्या खासदार स्व. प्रकाश पाटील आणि काँग्रेस नेत्या शैलजा पाटील यांच्या कन्या होत्या. त्या माजी केंद्रिय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या भगिनी होत्या. त्यांच्यावर शनिवारी दुपारी पद्माळे येथे एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.
शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास पुण्यात असताना त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांचा मृत्यु झाला.
त्यांच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या वयाच्या ४४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. वसंतदादा पाटील यांचा त्यांच्यावर खुप जीव होता. त्यांना वसंतदादा प्रेमाने चिमुताई म्हणून हाक मारायचे. लहानपणी त्यांच्यावर दोनवेळा ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली होती.
त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. एवढं सगळं होऊनही त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आणि जनतेच्या सेवेत स्वताला व्यस्त करून घेतलं होतं. वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी अनेक रुग्णांची मदत केली. सामान्य जनतेसाठी त्यांनी खुप काम केले.
त्याशिवाय बोगस डॉक्टरांविरूद्ध त्यांनी एक मोहीम उभी केली होती जी खुप गाजली होती. सध्या त्या पुण्यात आरोग्य उपसंचालक कार्यालयात सेवेत होत्या. कोरोनाकाळातही त्यांनी अनेक रुग्णांवर उपचार केले होते. आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले होते.
महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut: कैदी नंबर ८९५९ संजय राऊत जेलमध्ये दिवसभर करतात ‘हे’ काम, समोर आली दिनचर्या
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच दिलं इंग्रजीत भाषण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
संजय राठोडांना राखी बांधा नाहीतर…; राठोड समर्थकांचा चित्रा वाघ यांना इशारा