Share

युपीत EVM घोटाळा? भाजपची सत्ता जाणार? 142 जागांसाठी पुन्हा निवडणूक? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य…

नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. या पाच राज्यांपैकी उत्तरप्रदेशच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. उत्तर प्रदेश मध्ये 403 पैकी 255 जागा मिळवून भाजप पुन्हा एकदा सत्तेत आले. मात्र आता EVM मध्ये घोळ या कारणामुळे 142 जागांसाठी पुन्हा एकदा मतदान होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उत्तर प्रदेश मध्ये भाजपने मोठे यश संपादित केलं आहे. 403 पैकी 255 जागा मिळवून पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. मात्र, याच पार्श्वभूमीवर आता EVM मध्ये घोळ झाल्याचा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 142 जागांसाठी पुन्हा एकदा मतदान होईल असे या मेसेज मधून सांगण्यात येत आहे . परंतु हा व्हायरल होणारा मेसेज खरा आहे का? EVM मध्ये घोळ झाला आहे का? आता पुढे पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये मतदान होणार का असे अनेकांना प्रश्न पडले आहेत .

मात्र या व्हायरल मेसेज मागील सत्य नेमकं काय आहे हे जाणून घेऊ. PIB फॅक्ट चेकने दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल होणारा मेसेज पुर्णपणे खोटा आहे. अशा प्रकारचा कुठलाही घोळ निवडणूकीत झाला नव्हता. शिवाय जनतेनं दिलेला निकाल अंतिम आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मतदान होणार नाही. व्हायरल होणाऱ्या मेसेज वरती विश्वास ठेवू नाही, असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात काही पक्षांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला होता. ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचा आरोप समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर वाराणसी येथे आंदोलन केले होते. मतमोजणी केंद्राबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.

भाजपचे उमेदवार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर मतदार संघातून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. बडापूर विधानसभा मतदार क्षेत्रातून भाजपचे उमेदवार कुंवर सुशांत सिंह यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार कपिल कुमार यांचा 14345 मतांनी पराभव केला. बरहजमधून, बांसी, अमृतपूर या अनेक ठिकाणातून भाजप जिंकले.

राजकारण

Join WhatsApp

Join Now