Suryakumar Yadav, Rohit Sharma, South Africa, Team India/ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने आणखी एक मालिका जिंकली आहे. यासह, भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 238 धावांचे लक्ष्य दिले. जे पाहुण्या संघाला साध्य करण्यात अपयश आले.
या विजयानंतर हिटमॅन खूप आनंदी दिसत होता. सामना संपल्यानंतर रोहित शर्माने मॅच प्रेझेंटेशन दरम्यान टीम इंडियामधील वातावरणाबद्दल खुलासा केला. त्याने सांगितले की संघातील प्रत्येक खेळाडूला स्वतःचे मत मांडण्याची परवानगी आहे. तो म्हणाला, “हे असे काहीतरी आहे जे आम्हाला पुढे चालू ठेवायचे आहे”.
रोहित पुढे म्हणाला, गेल्या आठ-दहा महिन्यांत संघातील प्रत्येक सदस्याने आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केल्याचे माझ्या लक्षात आले आहे. संघातही, खेळाडू त्यांना कोणत्या रणनीतीने फलंदाजी करायची किंवा गोलंदाजी करायची यावर खुलेपणाने त्यांचे मत व्यक्त करतात. पुढे बोलताना रोहितने सूर्यकुमारच्या फॉर्मबद्दल सांगितले की, सूर्याचा फॉर्म कायम ठेवण्यासाठी त्याला ब्रेक द्यायचा आहे.
हिटमॅन म्हणाला, त्याला संघात पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. जसप्रीत बुमराहची दुखापत हा साहजिकच आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. डेथ ओव्हर्समध्ये देखील आपल्याला लक्ष केंद्रित करावे लागेल, ही एक बाजू आहे जिथे आम्हाला निश्चितपणे आव्हान दिले जाईल.
सुर्याचा फॉर्म कायम ठेवण्यासाठी मी त्याला थेट 23 ऑक्टोबरला खेळवण्याचा विचार करत आहे. 23 ऑक्टोबरला पाकिस्तान संघाविरुद्ध त्याची अशीच कामगिरी राहावी अशी माझी इच्छा आहे. रोहित शर्माने टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठी खेळी खेळली नसली तरी त्याने केएल राहुलसह संघाला चांगली सुरुवात करण्यात मदत केली.
रोहितने केएलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. या सुरुवातीमुळे संघाला 238 धावांसारखा मोठा डोंगर उभा करता आला. याशिवाय त्याने वैयक्तिकरित्या संघासाठी 43 धावा केल्या. भारताने हा सामना 16 धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली.
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्माने घातला धुमाकूळ, विराटचाही विक्रम मोडत ‘या’ खास यादीत मिळवले स्थान
Virat Kohli: संपुर्ण सामन्यात रोहित शर्माने विराटला स्वत:जवळ फिरकूही दिले नाही, ‘हे’ होते त्यामागचे कारण
रोहित शर्मामुळे ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्यात खडाजंगी; काय झालं नेमकं? पाहा व्हिडीओ