आपल्याला चांगला जोडीदार मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु प्रत्येकालाच चांगला जोडीदार मिळेल असे नाही. लग्नानंतर काही जण आपल्या जोडीदारासोबत खुश नसतात.जरी विचार जुळत नसले तरी काही जण आयुष्य एकत्र काढतात. तर काही जण विचार जुळले नसल्याने त्या नात्यातून मोकळे होऊन नवीन जोडीदार शोधात असतात.
परंतु तुम्ही कधी असा विचार केला आहे का जर नवीन जोडीदारासोबत तुम्ही समाधानी नसाल तर काय होईल. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे. उटा शहरात राहणाऱ्या मोनेट डियास नावाच्या एका महिलेने तब्बल अकरा वेळा लग्न केलं आहे. अकरा वेळा तिची स्वप्ने तुटली आहेत. तरीही या महिलेला अजुन एकदा लग्न करण्याची इच्छा आहे.
मोनेट यांचे वय 52 वर्षे असून त्या इंटेरियर डिझायनर आहेत. त्यांनी आतापर्यंत 11 जणांसोबत लग्न केले तरीही त्यांना मनासारखा जोडीदार मिळाला नाही. ‘हार मानणाऱ्या व्यक्तीला सगळे नापसंत करतात. ज्या व्यक्तीसोबत माझे चांगले संबंध राहतील अशाच व्यक्तीसोबत मी लग्न करणार आहे’,असे मोनेट यांनी स्पष्ट केले आहे.
डियास या एका शोमध्ये त्यांच्या बॉयफ्रेंड जॉनसोबत आल्या होत्या. शो दरम्यान त्यांनी दोघांचे नाते खूप घट्ट असल्याचे दाखवले होते. परंतु दोघांमध्ये त्यांच्या नात्याच्या भविष्यासंबंधी वाद झाले. हे वाद टोकाला गेल्याने त्यांचे नाते संपुष्टात आले. याच शोमध्ये त्यांनी नाते तुटण्याचे कारण सांगितले होते.
‘मी या नात्यासाठी खूप मेहनत घेतली होती. परंतु अजुन एका अपयशामुळे मला खूप वाईट वाटत आहे. तुम्ही ज्या व्यक्तीसाठी सगळे काही सोडून देतो नेमकी तीच व्यक्ती तुम्हाला दुखावते. सतत अपयश आले असले तरी एक दिवस मला माझे प्रेम नक्कीच मिळेल.माझ्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती नक्की असेल कि जी माझी वाट पाहत असेल’, अशी आशा मोनेट यांनी व्यक्त केली आहे.
मोनेट यांची बहिण मार्सी या 38 वर्षांपासून चांगला संसार करत आहे. त्यांनी मोनेट यांच्या संसारावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘ सुरुवातीला डियासने 2 ते 3 वेळा लग्न केले तेव्हा मला काहीच गैर वाटले नाही. परंतु तिने 11 वेळा लग्न केल्यानंतर मला असे वाटत आहे की तिला कधीच योग्य जोडीदार मिळणार नाही,’ असे मत मार्सी यांनी व्यक्त केले आहे.