‘ठाकरे’ सिनेमाही महाराष्ट्रात टॅक्स फ्री केला नाही, ‘द काश्मीर फाईल्स’ कुठे घेऊन बसलाय- संजय राऊत

मुंबई | दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट ११ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच सर्व स्तरातून या चित्रपटाचे तसेच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे तोंडभरून कौतुक करण्यात आले. तसेच या चित्रपटाने आपले नवीन रेकॉर्ड बनवले असून, प्रेक्षकांनी या चित्रपटाला अगदी डोक्यावर घेतल्याचे दिसून येत आहे.

या चित्रपटात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण केले आहे. या चित्रपटात दिग्गज अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या अभिनेत्यांचा देखील समावेश आहे. अग्निहोत्री यांच्या दिग्दर्शनामुळे हा चित्रपट सुपर हिट होईल यात शंका नाही.

एकीकडे ‘द काश्मीर फाईल्स’ कमाईचे वेगवेगळे रेकॉर्ड बनवत आहे. तर दुसरीकडे ‘द काश्मीर फाईल्स’ मुळे राजकारण चांगलेच तापले आहे. ज्या-ज्या राज्यात भाजप पक्ष सत्तेत आहे त्या राज्यात ‘द काश्मीर फाईल्स’ करमुक्त करण्यात आला आहे. कर्नाटक, हरियाना, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, या राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्रातही ‘द काश्मीर फाईल्स’ करमुक्त करावा अशी मागणी भाजपाचे कार्यकर्ते करत आहेत. भाजपाच्या काही नेत्यांनी अगदी विधानपरिषदेत धाव घेवून हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. तसेच अनेक स्तरातून या मागणीला पाठींबा दिला जात आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले. याच प्रकारे अनेक राजकीय नेत्यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या करमुक्तीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना देखील काही प्रश्न विचारण्यात आले. आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत म्हणाले, ‘द कश्मीर फाइल्स’चं काय घेऊन बसलात? आम्ही ‘ठाकरे’ हा चित्रपट देखील महाराष्ट्रात करमुक्त केला नव्हता. ‘ठाकरे’ हा चित्रपट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत होता. चित्रपट उत्तम होता मात्र तरीही आम्ही तो करमुक्त केला नाही. तसेच हा चित्रपट करमुक्त व्हावा अशी मागणी हि केली नाही.

राऊत यांनी पुढे असेही सांगितले कि, काश्मीरबद्दल शिवसेनेच्या काय भावना आहेत हे संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यामुळे ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या मुद्द्यावरून जे राजकारण चालले आहे ते योग्य नाही. लोकांना आवडला तर लोक नक्कीच येवून बघतील असेही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:
‘झुंड’ विरुद्ध ‘काश्मीर फाइल्स’ वादावर नागराज मंजुळे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मी फक्त झुंडच बघणार…’
..तेव्हा मी रडत रडत भर उन्हात मरीन ड्राईव्हवरून वांद्र्यापर्यंत पायी गेले, विद्या बालनचा धक्कदायक खुलासा 
‘तुम्हाला १६ कोटींचा खेळाडू झेपणार नाही’, बढाई मारणाऱ्या PCL ला माजी क्रिकेटपटूने दाखवली जागा
सलमान खान मेगास्टार चिरंजीवींच्या ‘या’ चित्रपटात फ्रीमध्ये करणार काम; साऊथमध्ये करणार दमदार एन्ट्री