Share

याला म्हणतात क्रेझ! रिलीजपूर्वीच अल्लू अर्जुनच्या ‘या’ चित्रपटाला मिळाली ४०० कोटींची ऑफर

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर पुष्पाने जगभरात कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले. या चित्रपटाने हिंदी पट्ट्यात 100 कोटींहून अधिक कमाई करून बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. त्याची टॅगलाइन ‘पुष्पा द राइज’ ची क्रेझ आणि लोकप्रियता अशी आहे की या चित्रपटाने अल्लू अर्जुनला संपूर्ण देशाचा सुपरस्टार बनला आहे. चाहते आता त्यांच्या आवडत्या स्टारच्या ‘पुष्पा 2’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा 2 ला रिलीज होण्यापूर्वीच एका मोठ्या कॉर्पोरेट प्रॉडक्शन हाऊसकडून मोठी ऑफर मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने सर्व भाषांमध्ये ‘पुष्पा 2’ सिनेमाच्या राइट्ससाठी निर्मात्यांना सुमारे 400 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.

एवढी मोठी रक्कम केवळ सिनेमा रिलीजसाठी आहे, त्यात ओटीटी आणि टीव्ही अधिकारांचा समावेश नाही. तथापि, असे सांगण्यात येत आहे की पुष्पा मेकर्स ही ऑफर नाकारू शकतात. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच एवढी मोठी ऑफर मिळणे हे नक्कीच बरेच काही सांगून जाते आणि चित्रपटाच्या यशाची खात्रीही देते.

‘पुष्पा 2’ च्या यशाबद्दल निर्मात्यांना खात्री असली तरी ते अजूनही ऑफरवर विचार करत आहेत. सूत्र पुढे म्हणाला, पुष्पाला हिंदी मार्केटमध्ये यश मिळाल्यानंतर, निर्मात्यांना खात्री आहे की दुसरा भाग प्रेक्षकांना तितकाच आवडेल. पुष्पा चित्रपटातील डायलॉगनी आणि गाण्यांनी चाहत्यांना वेड लावले आहेत. त्याचे अनेक रील्स आपल्याला पाहायला मिळतात.

अधिकृतपणे ब्लॉकबस्टर घोषित झालेल्या या चित्रपटाने 100 कोटींहून अधिक कमाई करून हिंदी पट्ट्यातील सर्व विक्रम मोडले. हा चित्रपट 2021 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ब्लॉकबस्टरने दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 मध्ये ‘फिल्म ऑफ द इयर’ पुरस्कारही जिंकला.

महत्वाच्या बातम्या-
विमानतळावर IPS अधिकाऱ्याच्या बॅगेतून निघाल्या वाटाण्याच्या शेंगा; लोकं म्हणाले, वाटाणा स्मगलिंग सुरू आहे
हरभजन सिंह होणार AAP चा राज्यसभा उमेदवार, सांभाळू शकतो मोठी जबाबदारी
आकाश को कोई सीमा नहीं, सिद्धू के पास अब कोई काम नही, अभिनेत्याने उडवली खिल्ली
नवजात मुलीसाठी लेडी डॉक्टर बनली देवदूत, तब्बल सात मिनीटं तोंडाने श्वास देऊन वाचवला जीव

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now