Share

34 दिवस झाले तरी काश्मिर फाईल्सची कमाई थांबेना, आतापर्यंत कमावलेत ‘तब्बल’ एवढे कोटी

The Kashmir Files

काश्मिरी हिंदूंच्या निर्गमन आणि नरसंहारावर बनलेल्या ‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम केले आहेत. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने महिनाभरानंतरही तिकीट खिडकीवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत हिंदी पट्ट्यातच 252 कोटींची कमाई केली आहे.(even-after-34-days-the-earnings-of-kashmir-files-will-not-stop)

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते, रिलीज होऊन 34 दिवस उलटूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. दुसरीकडे, जर आपण जगभरातील कलेक्शनबद्दल बोललो, तर चित्रपटाची कमाई जवळपास 340 कोटींवर पोहोचली आहे.

तरण आदर्शच्या(Taran Adarsh) ट्विटनुसार, या चित्रपटाने गेल्या आठवड्यात हिंदी पट्ट्यात शुक्रवारी 50 लाख रुपये, शनिवारी 85 लाख, रविवारी 1.15 कोटी, सोमवारी 30 लाख, मंगळवारी 32 लाख, बुधवारी 25 लाख आणि बुधवारी 15 लाखांची कमाई केली. अशा प्रकारे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 252 कोटींच्या आसपास पोहोचले आहे. फक्त 12 कोटी रुपये खर्चून बनवलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ने आतापर्यंत आपल्या बजेटपेक्षा 28 पट अधिक कमाई केली आहे.

काश्मीर फाइल्सने मुंबईत(Mumbai) सर्वाधिक कमाई केली होती. तिथे चित्रपटाने जवळपास 70 कोटींची कमाई केली. दुसरीकडे दिल्ली आणि यूपी दुसऱ्या क्रमांकावर होते. येथे या चित्रपटाने जवळपास 68 कोटींची कमाई केली. यानंतर पूर्व पंजाबमधून 34 कोटी, राजस्थानमधून 15 कोटी, चंदीगडमधून 12 कोटी, म्हैसूरमधून 12 कोटी, पश्चिम बंगालमधून 11 कोटी, निजाम-आंध्र प्रदेशमधून 10 कोटी, बिहार-झारखंडमधून 5 कोटी, तामिळनाडूमधून 4 कोटी, केरळ-ओडिशातून 3 कोटी आणि आसाममधून 3 कोटी कमावले.

‘द काश्मीर फाइल्स’नंतर आता या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिल्ली दंगलीवर ‘दिल्ली फाइल्स’ सिनेमा बनवणार असल्याची घोषणा केली आहे. विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) यांनी ट्विट करून म्हटले की, ज्यांनी काश्मीर फाइल्सला यश मिळवून दिले त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराबद्दल लोकांचे डोळे उघडणे अत्यंत गरजेचे होते. या ट्विटवर एका युजरने म्हटले – अनेक वर्षांपासून दडलेले सत्य उघड केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. यासोबतच अनेकांनी काही विषयही सुचवले ज्यावर चित्रपट बनवता येतील.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now