सिनेसृष्टीतील कलाकारांचे नेहमी असे अनेक व्हिडिओ समोर येत असतात ज्यामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येत असतात. त्यांच हे व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल होत असतात. यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माचाही (adah sharma)एक व्हिडिओ सध्या फारच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अदासोबत भर रस्त्यात एक वेगळीच घटना घडल्याचे पहायला मिळत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत अदाला किन्नरांच्या एका ग्रुपने घेरलेलं दिसत आहे. अदाला पाहून हे सर्व किन्नर खूपच खूश झाले असून त्यांनी अदासोबत फोटो देखील काढल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओत दिसत आहे की, अदा शर्मा मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर पडते आणि तिच्या कारच्या दिशेने जाऊ लागते. याचदरम्यान किन्नरांचा एक ग्रूप तिथे आला. त्यानंतर त्यांनी अदासोबत फोटो घेण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी अदाशी संवादही साधला.
तर अदानेही त्यांच्याशी यावेळी चांगल्या पद्धतीने संवाद साधला. अदा त्यांच्याशी हसत बोलत होतीच सोबतच ती थोडीशी घाबरलेलीसुद्धा दिसून आली. व्हिडिओत पुढे दिसत आहे की, किन्नरांनी अदाच्या डोक्यावर हात ठेऊन तिला आशीर्वाद दिला आणि त्यानंतर अदा तिच्या कारकडे निघून गेली.
दरम्यान, व्हिडिओत एक व्यक्ती अदा शर्माला प्रोटेक्ट करताना दिसून आला. अदाचा हा संपूर्ण घटनाक्रम तिथे उपस्थित माध्यम कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला. अदाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच यावेळी ज्याप्रमाणे अदाने ही परिस्थिती सांभाळली याबाबत तिचे अनेकजण कौतुक करत आहेत.
दरम्यान, अदाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास ती ‘१९२०’, ‘कमांडो २’ यासारख्या चित्रपटांमध्ये दिसून आली होती. लवकरच ती विद्युत जामवाल यांच्या ‘कमांडो ३’ या चित्रपटात दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘बाब्या खातो दहा लाडू पण त्याला देणार कोण?’ अशी परिस्थिती सध्या मराठी सिनेसृष्टीची – चिन्मय मांडलेकर
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; आईला झालाय कॅन्सर, सोशल मिडीयावर दिली माहिती
रोहित शेट्टीच्या ‘Indian Police Force’ मध्ये ‘या’ अभिनेत्याची एंट्री, फर्स्ट लूक पाहून तुम्हीही व्हाल अवाक