esha gupta bold look video | बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिच्या हॉट लुकमुळे ईशा गुप्ता सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ती अनेकदा तिचे सुपर हॉट फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
तसेच ईशा काहीवेळा तिचे वर्कआउट व्हिडिओ सुद्धा इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अशात ईशा गुप्ताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती खुपच बोल्ड लुकमध्ये दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहते सुद्धा घायाळ झाले आहे.
शुक्रवारी अभिनेत्री ईशा गुप्ताने मुंबईत एका लॉन्जरी शोसाठी रॅम्प वॉक केला. ईशा गुप्ताने रॅम्प वॉकसाठी कॉटन ब्लॅक स्लिट ड्रेस परिधान केलेला होता. रॅम्प वॉक करताना ईशा खुप सुंदर आणि बोल्ड दिसत होती यात शंका नाही. तिने यावेळी डीप नेक कॉटनचा ड्रेस घातलेला होता.
ईशाची फिगर इतकी परफेक्ट आहे की तिला पाहून कोणाचीही झोप उडू शकते. यावेळी जेव्हा ईशा रॅम्प वॉक करत होती, तेव्हा तिच्या लुकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. तिच्या या रॅम्प वॉकचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.
दरम्यान, ईशा गुप्ताने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक वर्कआउट व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामुळे खूप वाद झाला होता. ईशाच्या वर्कआउट व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने बॅकग्राउंडमध्ये भगवान शंकराचे भजन लावलेले होते. यानंतर या अभिनेत्रीला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले.
ईशा गुप्ता एक फिटनेस फ्रीक आहे जी तिच्या आरोग्याची खूप काळजी घेत असते. अनेकदा ईशाचे वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अखेरची बॉबी देओलसोबत ‘आश्रम ३’ या वेब सीरिजमध्ये ‘सोनिया’च्या भूमिकेत दिसली होती.
महत्वाच्या बातम्या-
तुमचा सरकारी ॲटीट्यूड बाजूला ठेवा, नाहीतर कायमचे पॅकअप करावे लागेल; BSNL कर्मचाऱ्यांना सरकारची वाॅर्निंग
Rohit Pawar: हिंदूंवर हल्ला झाला तर जशाच तसं उत्तर देऊ म्हणणाऱ्या राणेंना रोहित पवारांचे उत्तर; म्हणाले…
BJP: दिपक केसरकरांना भाजपने झापले, शिंदे गटाला दिला इशारा; त्यांच्या तोंडाला आवर घाला नाहीतर…..