कर्नाटकात सुरू झालेल्या हिजाब वादामुळे एक प्रकारे भीती निर्माण झाली आहे. तसेच हिजाबच्या वादावरून कर्नाटकात राजकारण चांगलंच तापलंय. सत्ताधारी भाजप (BJP) आणि काँग्रेस पक्ष (Congress Party) आमनेसामने आहेत. कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे.
या घटनाचा अनेक सर्वसामान्यांसह राजकीय पक्ष देखील निषेध करत आहे. दरम्यान कर्नाटकच्या उडुपी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयाच्या आसपासच्या परिसरात 14 फेब्रुवारीपासून 19 फेब्रुवारीपर्यंत कलम 144 लागू केले आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय परिसरात सुमारे 200 मीटरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.
अशातच हिजाब काढायला लावल्यामुळे आज एका महिला शिक्षिकेनं राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे. आज हिजाब काढायला लावल्यामुळे एका महिला शिक्षिकेनं राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चांदिनी ही तुमाकुरू येथील जैन पीयू कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत आहेत.
याबाबत बोलताना तिने सांगितले की, “मी गेल्या तीन वर्षांपासून जैन पीयू कॉलेजमध्ये काम करत आहे. मला आतापर्यंत कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागला नाही. पण काल मला मुख्याध्यापकांनी सांगितले की, मी शिकवताना हिजाब किंवा कोणतेही धार्मिक चिन्ह घालू शकत नाही.
तसेच पुढे बोलताना ती म्हणतीये, ‘मी गेल्या तीन वर्षांपासून हिजाब परिधान करून विद्यार्थ्यांना शिकवत आहे. हा नवा निर्णय माझ्या स्वाभिमानाला धक्का देणारा आहे. म्हणूनच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे चांदिनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तर दुसरीकडे याप्रकरणी कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं. काही संघटना मुलींना भडकवण्याचं काम करत आहेत, असा आरोप शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी केला आहे. डिसेंबरपूर्वी विद्यार्थिनींना हिजाबमुळं कोणतीही अडचण नव्हती. डिसेंबरपूर्वी मुली हिजाबशिवाय शाळेत यायच्या. परंतु, आता उडुपीत 9 पीयू कॉलेज असून, त्यात केवळ एकाच कॉलेजमध्ये हा वाद सुरू झाला. तसेच विद्यार्थिनींना गणवेश संहितेचं पालन करावं लागेल, असंही नागेश यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
या मावळ्याला मानाचा मुजरा! घरावरच बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा, दररोज करतो शिवपूजा
करोडोंची मालकीण आहे शार्क टॅंक इंडियाची जज नमिता थापर, अशी उभी केली हजारो कोटींची कंपनी
‘मी सुंदरकांड यासाठी केलं कारण माझी पत्नी सुंदर आहे, मी कांड करत असतो’, आमदाराचे बेताल वक्तव्य
बाळाचं नाव पंतप्रधान ठेवणं दाम्पत्याला पडलं महागात; जाणून घ्या नक्की काय घडलं