पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपच विजयी होणार असल्याचे दिसत असून काँग्रेसचे हाती अपयश लागल्याचे स्पष्ट होत आहे. आपला पराभव होत असल्याचे पाहून काँग्रेसचे महासचिव प्रियंका गांधी यांनी निराश होण्याचे कारण नाही, आपला लढा अजून सुरुच आहे असा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे.
प्रियंका गांधी यांनी ट्विट करत, राज्यात दीर्घकाळ काँग्रेसचे सरकार नसतानाही तुम्ही ज्याप्रकारे जनतेसाठी लढलात आणि राजकारणाचा खरा उद्देश असलेल्या जनसेवेसाठी कटिबद्ध राहिलात, याचा मला खूप अभिमान असल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये होत असलेला परावभ पाहून प्रियंका गांधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
https://twitter.com/priyankagandhi/status/1501594466246791170?t=inbKdWp_5HwoskVPJBp-VA&s=19
त्यांनी म्हटले आहे की, “जनादेशाचा आदर करत देश व राज्याप्रती निष्ठा व समर्पण भावनेने लढा सुरू ठेवण्याची तयारी आपल्याला करावी लागेल. आपला लढा नुकताच सुरू झाला आहे. आपल्याला धैर्याने आणि नव्या ऊर्जेने पुढे जायचे आहे,” काँग्रेसने सत्तेत येण्यासाठी सगळे प्रयत्न केले होते. परंतु आता या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही.
पंजाबमध्ये काँग्रेसला जोरदार धक्का देत आप बहुमताच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे. आम आदमी पार्टीने ७४ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसला ३० आणि अकाली दल १० जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीचा पंजाबमध्ये विजय होताना दिसत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये पाहिल गेले तर, भाजप 200 जागांसह आघाडीवर आहे. तर सपा 105 जागा, बसप, 05, अन्य 03, काँग्रेस 03 जागांवर आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. यामुळे यंदा भाजपच सत्तेत असेल हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. गोवा राज्यात भाजप आघाडीवर असून काँग्रेसला पिछाडीवर पडलं आहे. त्यामुळे गोव्यात भाजपचीच सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे गोव्यात देखील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या
समाजवादी पक्ष पराभव स्वीकारायला तयार नाही; कार्यकर्त्यांना केलं आवाहन, ‘बुथवर उभे राहा, सपा नक्की जिंकेल’
‘’गोवेकरांनी शिवसेनेची लाज काढली’’
‘गोवा और युपी में ‘म्याव म्याव’ की आवाज नहीं सुनाई दीं भाई, व्हेरी सॅड’, नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचले
बड्या बड्या बाता मारणाऱ्या शिवसेनेची गोव्यात लाजिरवानी हार; मिळाली नोटापेक्षाही कमी मते