election committee mail to uddhav thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. तसेच त्यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक नेते शिंदे गटात गेले आहे. १२ खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आपल्याकडे जास्त नेते असल्यामुळे आपण खरी शिवसेना असल्यादा दावा एकनाथ शिंदे करत आहे.
चिन्हावरुन हा वाद सुरु आहे. हा वाद निवडणूक आयोगात पोहचला असून यावर निवडणूक आयोगच निर्णय घेणार आहे. तसेच निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ७ लाख शपथपत्रे निवडणूक आयोगासमोर सादर केली होती.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी २८० जणांच्या कार्यकारिणीतील २०० जणांचे शपथपत्र सादर केले होते. शिवसेनेने पुरावे सादर केल्यानंतरही निवडणूक आयोगाने शिवसेनेला मेल केला आहे. सादर केलेले कागदपत्र हे नियमांप्रमाणे नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
तसेच पुन्हा एकदा हे कागपत्र उद्धव ठाकरे गटाने सादर करावे असे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत रात्री उशिरा निवडणूक आयोगाचा मेल आला होता. त्यामध्ये मेलमध्ये शिवसेनेने सादर केलेले कागदपत्र हे नियमानुसार नाहीत, असे म्हटलेले होते. तसेच याबाबत कोणतीही पुर्वसूचना न देता त्यांना पुरावे सादर करण्याची डेडलाईन सुद्धा देण्यात आली.
आज दुपारपर्यंत निवडणूक आयोगाने डेडलाईन दिली होती. पण हा खुप कमी वेळ आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वकीलांकडून आजचीच डेडलाईन का? याबाबत विचारणा करण्यात आली आहे. याबाबत एक पत्र पाठवण्यात आले असून डेडलाईन वाढवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शिंदे गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर दावा दाखल केल्यानंतर हा वाद वाढला आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन बंडखोरी केली होती. त्यांनी पक्ष सोडला होता. ते आता पक्षाचे सदस्यही नाहीत. त्यामुळे ते पक्षाच्या चिन्हावर दावा कसे करु शकतात, असे उद्धव ठाकरेंच्या वकीलांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Alka kubal : अलका कुबल यांच्या पायलट लेकीने पुन्हा घेतली उंच भरारी; मुलीला शुभेच्छा देत अलका कुूबल म्हणाल्या…
uddhav thackeray : आणखी एक ठाकरे येणार राजकारणात, बाळासाहेबांच्या मोठा नातू म्हणतो बापाचं देणघेणं नाही, उद्धवकाकांनी संधी….
nashik : ‘कंडक्टर मागे पॅसेंजरला उठवायला गेला,अन्…,’ मालकाने सांगीतले नाशिकमधील बस कशी अन् केव्हा पेटली