आपल्या पोटच्या मुलासाठी आई कोणत्याही थराला जाऊ शकते हे पुन्हा एकदा एका समोर आलेल्या घटनेतून सिध्द झाले आहे. पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यात एका आईने आपल्या मुलाचे गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रस्तावर भिक मागत तब्बल 80 हजार जमा केले आहेत. तीच्याकडे जमा झालेली ही रक्कम पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सध्या थक्क करुन सोडणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आईने जमा झालेल्या पैशांतून मुलाला गाडी घेऊन दिल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यात राहणाऱ्या बाला पाडे अत्यंत गरिब कुटुंबातील आहेत. पत्नीच्या निधनानंतर त्यांनी घराची सर्व जबाबदारी स्विकारली.
बाला यांचा राकेश नावाचा एक मुलगा आहे. तो देखील छोटीमोठी कामे करत आपल्या आईला हातभार लावतो. गेल्या कित्येक वर्षापासून राकेश आपल्याला एक स्कूटी हवी असल्याची इच्छा आईकडे व्यक्त करत होता. परंतु गरिबीमुळे स्कूटी घेणे त्यांना शक्य होत नव्हते.
स्कूटी खरीदने के लिए 80 हजार रुपये के सिक्के शोरूम में ले पहुंचा शख्स, देखिए ये वीडियो pic.twitter.com/y5qDLqzGu0
— India.com (हिन्दी) (@IndiacomNews) March 30, 2022
मात्र बाला यांना आपल्या मुलाने व्यक्त केलेली ही इच्छा कोणत्याही परिस्थितीत पुर्ण करायची होती. त्यामुळे त्यांनी भीक मागत पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला. गेले कित्येक वर्षे बाला आपल्या मुलासाठी रस्तावर भीक मागत होत्या. त्यांनी एक एक रुपया जमा करत तब्बल 80 हजार कमविले.
जमा झालेले सर्व पैसे त्यांनी आपल्या मुलाच्या हातात दिले. यावेळी मुलाला अक्षरशः रडू कोसळल्या शिवाय राहिले नाही. कारण त्याच्या आईने उन्हात थांबत पोटाला चिमटा देत त्याच्यासाठी हे पैसे जमा केले होते. यानंतर राकेशने सर्व जमा झालेले पैसे एकत्र करुन डब्यात भरले. हा डब्बा घेऊन तो थेट गाडीच्या शोरुममध्ये गेला.
तिथे गेल्यानंतर जमा झालेले चिल्लर पाहून सर्वांनाच धक्का बसला. शेवटी त्याने आपल्याला एक स्कूटी घेतली. आपले स्वप्न पूर्ण होत आहे या गोष्टीवर राकेशला विश्वास बसला नाही. यावेळी त्याने आपल्या आईचे खूप आभार मानले.
तसेच, माझी आई महान आहे. तिने माझं स्वप्न पुर्ण केलं. खरं तर तिला स्कुटीवर बसवून फिरता यावं यासाठी मला स्कूटी हवी होती. पण तिने माझ्या मनातील इच्छा ओळखली आणि वेळप्रसंगी उपाशी राहून माझी ती इच्छा पुर्ण केली. मी खूपच नशीबवान आहे अशी आई मला मिळाली. आता आईला घेऊन मी मस्तपैकी स्कुटीवरुन फिरणार असल्याचे राकेशने म्हटले.
महत्वाच्या बातम्या
शिळ्या चपात्या फेकून देताय? त्याआधी वाचा शिळ्या चपात्या खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
रात्रीच्या तापमानात वाढ झाल्याने पुरूषांना मृत्युचा धोका, संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर
भारताला कसाबचा पत्ता कसा मिळाला? इतक्या वर्षांनी पाकिस्तानच्या मंत्र्याने उलगडले रहस्य
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? काँग्रेससह शिवसेनेचे ९० टक्के आमदार नाराज, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट