Share

मोठ्या बहिणीने आपल्या ४ प्रियकरांसोबत मिळून केला छोट्या बहिणीवर बलात्कार, मग केलं ‘हे’ भयानक कृत्य

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे मंगळवारी एका १३ वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात चार जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात ७ जणांना अटक केले आहे. त्यात अटक करण्यात आलेल्या ७ जणांमध्ये तिच्या मोठ्या बहिणीचाही समावेश आहे.(Rape, Elder Sister, Illegal Relationship, Lakhimpur, Sanjeev Suman,)

मुलीच्या मोठ्या बहिणीचे इतर चार आरोपींसोबत अवैध संबंध होते, त्याला तिने विरोध केला. यावरून दोन्ही बहिणींमध्ये वारंवार भांडणे होत होती. पोलिस अधीक्षक संजीव सुमन यांनी बुधवारी सांगितले की, १३ वर्षीय मुलगी शेतात शौच करण्यासाठी गेली होती. दुपारी काही ग्रामस्थांना शेतात तिचा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

या प्रकरणी मृताच्या मोठ्या बहिणीसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. मुलीची हत्या करण्यापूर्वी चार तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून मुलीच्या मोठ्या बहिणीने आरोपीला मदत केली होती. यावेळी सहा युवक आणि तरुणीची बहीण उपस्थित होती.

त्यापैकी रणजीत चौहान, अमर सिंह, अंकित आणि संदीप चौहान यांनी दीपू आणि अर्जुन पहारा देत असताना मुलीवर बलात्कार केला होता. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीचे इतर चार आरोपींसोबत अवैध संबंध होते, ज्याला तिने विरोध केला. यावरून दोन्ही बहिणींमध्ये वारंवार भांडणे होत होती.

या वैमनस्यातून मोठ्या बहिणीने आपल्या सहकाऱ्यांसोबत ही घटना घडवून आणण्याचे ठरवले आणि तिला शौचाच्या बहाण्याने उसाच्या शेतात नेले, तेथे ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुलीचा दुपट्ट्याने गळा आवळून खून करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यावर शिंदेंनी पहील्यांदाच दिली प्रतिक्रीया, म्हणाले आमचा फोकस..
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
शेतकऱ्याला नांगरणी करताना शेतात सापडल्या हजारो रुपयांच्या नोटा, क्षणात गावकरी गोळा झाले अन्…

ताज्या बातम्या क्राईम तुमची गोष्ट

Join WhatsApp

Join Now