Share

सख्खा भाऊ पक्का वैरी! कपडे वाळत घालण्यावरुन झाला वाद; लहान भावाची केली हत्या

Kolkata

कपडे वाळत घालण्याच्या किरकोळ वादातून मोठ्या भावानं आपल्याच लहान भावाची हत्या केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. मृत पावलेल्या तरुणाचं नाव गोपाल मंडल असं असून त्याचा मोठा भाऊ कृष्ण मंडल याचा मुलगा ऋतिक आणि पत्नी पूर्णिमा व मुलगी प्रियासोबत वाद झाला होता. (Elder brother murders younger brother in Kolkata)

कोलकाता एअरपोर्ट जवळील विद्यासागर पल्ली परिसरात हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्ण आणि त्याच्या मुलाने गोपालला भर रस्त्यात लाथेनं मारहाण केली. शेजाऱ्यांनी गोपालला वाचवलं. गंभीर जखमी झालेल्या गोपलाला व्हीआयपी रोडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्याला मृतं घोषित केलं.

दरम्यान, घरात टॉवर लावण्याच्या मुद्द्यावरुन दोन भावांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. घरात नेहमीच छोट्या-मोठ्या कारणांवरुन भांडणं सुरू असायची असे शेजाऱ्यांनी सांगितले. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर पोहोचली. पोलिसांनी चार आरोपांना अटक केली आहे. यात भक्त कृष्ण मंडल, अनिमा मंडल, प्रिया मंडल आणि ऋतिक मंडल यांचा समावेश आहे.

तर दुसरीकडे सासूची सुनेने हत्या केल्याची घटना देखील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरातील शिवाजीनर येथे घडली आहे. चारित्र्यावरून सासू सुनेला टोमणे मारत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यातूनच सुनेनं टोकाचं पाऊल उचलत सासूची हत्या केली. त्याचबरोबर सासू आशा आणि सून सरोज यांच्यात नेहमी शुल्लक कारणांवरून वाद देखील होत होते.

सुनेने सासू घरात पूजा करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुनेने सासू घरात पाय घसरून पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला असल्याचा बनाव रचला. आशा यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. पण रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

मात्र शवविच्छेदनात त्यांच्या डोक्यात बंदुकीची गोळी आढळून आली. मग पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगानं फिरवली आणि सरोजचा बनाव उघड झाला. हत्येसाठी रचलेला कट ऐकून पोलिसही हैराण झाले. सासू सुनेचं किरकोळ भांडण थेट हत्येपर्यंत गेल्यानं यवतमाळ जिल्हा हादरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
ओला स्कुटरच्या यशानंतर आता येणार ओलाची इलेक्ट्रिक कार, टाटा, ह्युंदाईला देणार टक्कर
गॅंगस्टर विकास दुबेच्या पत्नीचे योगींवर गंभीर आरोप, म्हणाली, ‘आमचा छळ केला जात आहे’
उत्पल पर्रीकर हाती घेणार भगवा? सेनेच्या बड्या नेत्याच्या विधनाने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
विद्यार्थीनीने शाळेतून घरी जाण्यास दिला नकार, शिक्षीकेने विचारपूस करताच झाला धक्कादायक खुलासा

इतर क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now