गेल्या २३ मार्च रोजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा ४६ वा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरी करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर सोशल मिडियाच्या माध्यमातून राजकिय मंडळींपासून ते सिनेसृष्टीतील कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. परंतु या सगळ्यात मैत्रिण असणाऱ्या एकता कपूरच्या ३ वर्षीय मुलाच्या शुभेच्छा इराणी यांना सगळ्यात जास्त भावल्या. सध्या एकता कपूरच्या याच तीन वर्षीय मुलाने लिहलेली पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.
एकता कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या मुलाचा म्हणजेच रवीचा इराणीसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रवीने मावशी स्मृती इराणीसाठी एक नोट लिहले आहे. यामध्ये त्याने, “‘प्रिय स्मृती मावशी, मी तीन वर्षांचा आहे आणि मला माहीत आहे की मी तुम्हाला फार कमी वेळा भेटलोय. माझ्या आईनं एक चांगली गोष्ट केली आहे. ती अशी की, तिने तुमच्याकडून खूप चांगल्या गोष्टी शिकल्या आहेत.” असे स्मृती इराणी यांना म्हटले आहे.
तसेच, “मी माझ्या आसपासच्या लोकांना तुमच्याबद्दल बोलताना ऐकतो. ते म्हणतात की, तुम्ही खूप शक्तिशाली आहात. पण माझ्यासाठी तुम्ही माझ्या प्रेमळ मावशी आहात. मला माहीत आहे तुम्ही माझ्यापासून दूर असलात तरीही तुमचं माझ्यावर खूप प्रेम आणि तुम्ही माझी काळजी देखील करता.” हे इराणी यांना रवीने सांगितले आहे.
पुढे रवीने म्हटले आहे की, आज तुमचा वाढदिवस आहे आणि मी प्रार्थना करतो की तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. कदाचित तुम्ही त्या काही निवडक लोकांपैकी एक आहात ज्यांनी मला पाहिलं होतं आणि आशीर्वाद दिले होते. त्यातले काही आशीर्वाद मला तुम्हाला आज परत द्यायचे आहेत.
यानंतर, “मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मला माहीत आहे जेव्हा मी मोठा होईन तेव्हा मी महिलांचा आदर करेन. कारण तुमच्यासारखी स्त्री माझी मावशी आहे. आणि मला खात्री आहे मी जर कधी चुकलो तर तुम्ही मला ओरडाल आणि मला मार्गदर्शनही कराल. खुप सारं प्रेम, लवकरच भेटू. तुमचा भाचा- रवी.” अशा शब्दात रवीने आपल्या मावशीवरचे प्रेम व्यक्त केले आहे.
रवीने लिहलेल्या या नोटचे स्मृती इराणी यांनी तोंडभरुन कौतुक केले आहे. त्यांनी एकता कपूरने केलेल्या पोस्टवर कमेंट करत, ‘माझ्या रवी बाळा, मी तुला कधीच ओरडणार नाही. तू सर्वांनी प्रेमाने आणि आदराने वागशील याची मला खात्री आहे. तुझी प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद.’ असे उत्तर रवीच्या नोटला दिले आहे.
सध्या रवीने दिलेल्या याच शुभेच्छाचे सोशल मिडियावर कौतुक होताना दिसत आहे. स्मृती इराणी यांनी राजकिय वर्तुळात येण्यापूर्वी एकता कपूरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत काम केले होते. यानंतर त्यांनी मालिका सोडली असली तरी देखील त्यांनी एकता कपूरसोबत चांगले संबंध ठेवले. त्यामुळे आज रवीसाठी स्मृती इराणी एवढ्या प्रिय झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
या’ बॉलिवूड अभिनेत्याचे चित्रपट पाहण्यासाठी पाकिस्तानमध्ये व्हायची चेंगराचेंगरी
पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; 6 जणांनी कोयत्याने वार करत तरुणाचा केला खेळ खल्लास, घटनेचा LIVE व्हिडिओ
‘पठाण’ फ्लाॅप झाला तर शाहरूखला राहते घर ‘मन्नत’ विकावे लागणार? वाचा व्हायरल मेसेजमागचे सत्य
VIDEO: स्वत:ला झिरो फिगर म्हणवून घेणारी करीना बिर्याणी बघताच विसरली डाएट, एकटीनेच मारला ताव