Share

Ekta Kapoor : ‘या’ अभिनेत्यासोबत एकता कपूरला करायचं होतं लग्न, प्रेमात पार झाली होती वेडी

Ekta Kapoor (1)

Ekta Kapoor : टेलिव्हिजनची क्वीन एकता कपूरने रुपेरी पडद्यावर आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. बालाजी टेलिफिल्म्सच्या माध्यमातून ती टेलिव्हिजनवर राज्य करते. मात्र आजही एकता सिंगल आहे. तिने अजून लग्न केलेले नाही. याबद्दलची चर्चा कायमच मनोरंजन क्षेत्रात होत असते. तिच्या लग्नाबाबत पडलेल्या प्रश्नाचे उत्तर तिने चाहत्यांना दिलेय. तशी एक सोशल मीडियावर पोस्ट तिने शेअर केली आहे.

एकता कपूरने ज्या अभिनेत्याशी तिने लग्न केले असते, असे म्हटले आहे. त्या अभिनेत्याचा सरळ फोटो शेअर करत तिने चाहत्यांना थक्क करून सोडले. बॉलीवूडच्या या हँडसम हंक अभिनेत्याच्या वाढदिवसाला तिने त्या दोघांचा फोटो शेअर केला आहे.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून चंकी पांडे आहे. काही वर्षांपूर्वीचा चंकी पांडे सोबतचा जुना फोटो सोशल मीडियावर टाकत एकता कपूरने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चंकी पांडेसोबत लग्न करायचे होते. पण ते होऊ शकले नाही.’

‘त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर मी ब्लश केलं होतं. तेव्हा त्याने होकार दिला असता तर आज मी बॉलीवूड वाइफ असते,’ अशी मजेशीर टिप्पणी यावेळी एकताने केली. चंकी पांडे याने कॉस्ट्यूम डिझायनर असणाऱ्या भावना पांडेशी लग्न केले. चंकी पांडेची बायको मागील काही दिवसांपूर्वी ‘फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलीवुड वाइफ’ या नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध शोमध्ये झळकली होती.

त्याचाच संदर्भ घेत एकताने ‘बॉलीवूड वाइफ’ हा शब्द गमतीशीरपणे वापरल्याचे या पोस्टवरून दिसते. एकता कपूरने आजपर्यंत लग्न केले नाही. मात्र ती सरोगसीच्या माध्यमातून एका मुलाची आई बनली आहे. मनोरंजन विश्वामध्ये एकता कपूरच्या लग्नाबद्दल मात्र कायमच चर्चा असतात.

मागील काही काळापूर्वी बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्याशी एकता कपूरचे नाव जोडले जात होते. एकता कपूरने मात्र याबाबत माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता मात्र एकता कपूरने तिच्या सोशल मीडिया हँडलवर टाकलेल्या फोटोमुळे तिच्या लग्नाचा नवा किस्सा रंगणार हे मात्र नक्की.

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now