शिवसेना पक्ष शिंदेंच्या मोठ्या राजकीय बंडामुळे पूर्णपणे कोसळला असल्याचे चित्र दिसत आहे. आमदार, खासदारांना आपल्या गटात सामील करून आता एकनाथ शिंदे यांनी नवाच डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे. (Eknath Shinde’s final blow to Shiv Sena)
आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्या आधीच एकनाथ शिंदे यांनी आपल्या स्वाक्षरीतले पत्र निवडणूक आयोगाला पाठवले आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी नेमलेली कार्यकरणी बरखास्त करून नवी कार्यकारणी स्थापन केल्याची माहिती पत्रात देण्यात आली आहे.
बहुतांश आमदारांना, खासदारांना आपल्या गटात सामील केल्यानंतर आता पूर्ण पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे गटाकडून होताना दिसत आहे. त्यावरती आता निवडणूक आयोगाने या कार्यकारणीला मान्यता दिली तर पूर्ण शिवसेना पक्षच एकनाथ शिंदेंच्या ताब्यात जाणार आहे.
दरम्यान १२ खासदारांच्या स्वतंत्र गटाचे जे पत्र लोकसभा अध्यक्षांना सुपूर्त करण्यात आले होते. ते त्यांनी स्वीकारले आहे. त्या पत्रामध्ये संसदीय पक्षनेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोदपदी भावना गवळी यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात यावी, विनंती करण्यात आली होती. त्याला मान्यता मिळाली आहे.
त्यामुळे आता शिवसेना पक्षाकडून भावना गवळींची प्रतोद पदावरून हकालपट्टी करण्यात आली या गोष्टीला फार महत्व राहिले नाही. भावना गवळी यांच्या नियुक्तीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे.
त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २०१९ ला लोक जनशक्ती पक्ष संदर्भातील दिलेला निकाल तसेच १९८८ साली एका प्रकरणा संदर्भातील निकाल यांचा दाखला देऊन लोकसभा अध्यक्षांनी याप्रकरणी आपला निर्णय घेतला आहे. कोर्टात शिवसेनेच्या याचिकेचा काय निकाल लागेल? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
तुम्ही घोटाळे करायचे, लफडी करायची अन् फाईल्स उघडल्या की पक्षप्रमुखांच्या नावाने..; ठाकरेंनी बंडखोरांना झापले
पुण्यातील इलेक्ट्रिक बाईक शोरूमला आग, ७ बाईक्स जळून खाक, ओव्हर चार्जिंगमुळे झाला घात
“युती केव्हाच झाली असती, उद्धव ठाकरेही तयार होते, पण…”, राहुल शेवाळे यांनी केला मोठा खुलासा






