Share

एकनाथ शिंदेचा पुण्यात येताच अजितदादांना धक्का; एका झटक्यात बदलला ‘तो’ निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल पुरंदर येथे सभा झाली. त्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी पुरंदरच्या प्रलंबित असणाऱ्या विमानतळ प्रश्नावर एक मोठा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे अजित पवार यांच्या प्रभावाला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते. (Eknath Shinde’s arrival in Pune shocked Ajit Dada; ‘That’ decision changed in an instant)

या विमानतळाच्या नवीन आराखड्यानुसार बारामतीतील तीन गावांचा व पुरंदरमधील पाच गावांचा समावेश करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा मनसुबा शिंदे यांनी उधळून लावला आहे. पूर्वनियोजित जागेवरच विमानतळ होणार असल्याचा निर्णय याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी घेतला.

शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये या विमानतळात मंजुरी देण्यात आली. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये या विमानतळाच्या आराखड्यात बदल करण्यात आला. त्यानुसार पुरंदरमधील पांडेश्वर, रिसे, पिसे, नायगाव, राजुरी या गावांचा समावेश होता.

या गावांमधील कोरडवाहू, माळरान जमीन विमानतळासाठी घ्यावी, अशी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी केलेली मागणी मान्य करण्यात आली. या गावांसोबतच बारामतीतील चांदगुडेवाडी, भोंडवेवाडी, आंबे खुर्द या गावांचा देखील समावेश करण्यात आला.

मात्र संरक्षण मंत्रालयाकडून महाविकास आघाडीच्या आराखड्याला परवानगी मिळाली नव्हती. आता सत्ता बदल झाल्यानंतर माजी मंत्री विजय शिवतारे यांनी जुन्या आराखड्यानुसार विमानतळ व्हावे अशी भूमिका घेतली.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जुन्या आराखड्यानुसार विमानतळ होणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीकडून येत्या काळात कोणती प्रतिक्रिया यावर व्यक्त केली जाते हे पहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या-
Hrithik Roshan: रोशन पिता-पुत्राच्या जोडीने दिले अनेक हिट चित्रपट, पण ‘हे’ चित्रपट झाले इंटरनॅशनल फ्लॉप
Ashok Chavan: अशोक चव्हाण काँग्रेसला ठोकणार रामराम? स्वत:च खुलासा करत म्हणाले, मी भाजपमध्ये…
‘संजय राऊत समोर आले तर चपलेचा प्रसाद देईल’; ८५ वर्षीय आजी एवढ्या का भडकल्या

राजकारण ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now