Share

Eknath shinde : एकनाथ शिंदेंही घेणार भगवी शाल अन् हातात रुद्राक्षांची माळ; काढणार ‘हिंदू गर्व गर्जना यात्रा’

राज्यात येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांची कंबर कसली आहे. त्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे देखील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि पक्षबांधणीसाठी राज्यभर दौरा करणार आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या राज्य दौऱ्यापूर्वी शिंदे गटाकडून हिंदू गर्व गर्जना यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळात रंगली आहे. या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सामील होणार आहेत. शिंदे गटाकडून ही मोठी रणनीती आखली जात असल्याचं म्हटलं जात आहे.

ही यात्रा २० सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या या यात्रेत त्यांच्या समर्थक आमदारांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. शिंदे समर्थक आमदारांवर जिल्ह्यातील एका मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करुन एकनाथ शिंदे यांच्याबाबत जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतले जाणार आहे.

२० सप्टेंबर पासून ३० सप्टेंबरपर्यंत ही यात्रा सुरु राहील. एकीकडे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद आणि निष्ठा यात्रेचा पाचवा टप्पा १६ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. आदित्य ठाकरेंच्या यात्रेला हे उत्तर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या या यात्रेत त्यांच्या समर्थक आमदारांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत हिंदू गर्व गर्जना यात्रेची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या बैठकीसाठी जो फलक तयार करण्यात आला आहे त्यावर शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हे वाक्य छापण्यात आलं आहे.

या बहुचर्चित यात्रेसाठी एकनाथ शिंदे यांना भगवी शाल आणि रुद्राक्षांची माळ देण्यात आली आहे. त्यामुळं आता या यात्रेदरम्यान शिंदे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now