देशभरात सध्या ईडी विषयी अधिक चर्चा असते. आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपाखाली ईडी अनेक राजकीय नेत्यांची धरपकड करत असते. मात्र, या नेत्यांमध्ये भाजप नेता एकही नाही. तसेच ज्यांच्यावर ईडीचे आरोप होते ते भाजपमध्ये जाताच त्यांना क्लिनचिट मिळाली. हा प्रकाराची सर्वत्र चर्चा आहे.
विरोधी पक्षांवर वचक बसण्यासाठी भाजप ईडी सारख्या यंत्रणाचा वापर करत असल्याचं म्हटलं जात आहे. ईडी ही मोदी सरकारच्या इशाऱ्यावर काम करते अशी सर्वत्र चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, त्यामध्ये वारकऱ्याने देखील ईडी आणि मोदी सरकारवर टीका केली आहे.
एकनाथ शिंदे सर्वसामान्य शिवसैनिक होते. मग, त्यांच्याकडे एवढा पैसा कसा आला? याची चौकशी ईडीवाले का करत नाहीत? असा सवाल व्हिडीओच्या माध्यमातून सर्वसामान्य वारकरी भाजप सरकारला करत आहे. सध्या हा व्हिडीओ विरोधकांकडून प्रचंड व्हायरल केला जात आहे.
या व्हिडीओमध्ये वारकरी म्हणतो, भाजप सरकारनं आमची वाट लावली. कॉंग्रेसचंच सरकार चांगलं होतं. जो विरोधात बोलतो त्यांच्यावर ते केस करतात. आमच्यावर सुद्धा केस करा. आम्ही जाऊन बसू ईडी च्या तुरुंगात आम्ही घाबरत नाही. भाजप ईडी चा गैरवापर करत आहे.
तर दुसरा वारकरी म्हणाला, सगळ्यांच्या मागे तेच लागले आहेत. राज्यातलं सरकार ईडी मुळेच बदललं. राष्ट्रवादी, शिवसेनेच्या मागे ईडी लागते. मग भाजपवाले धुतल्या तांदळाचे आहेत का? एवढं मोठं बंड करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे पैसे कुठून आले? याची चौकशी ईडी ने का केली नाही?असा सवाल वारकऱ्याने केला.
भाजपा संदर्भात जनसामान्यांची प्रतिक्रिया
देश डोळे उघडतोय…… pic.twitter.com/FEjXHXrHRU— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 8, 2022
वारकऱ्यांचा हा व्हिडीओ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी शेअर केला आहे. भाजपा संदर्भात जनसामान्यांची प्रतिक्रिया देश डोळे उघडतोय अशी कमेंट त्यांनी या व्हिडीओवर केली आहे. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.