Share

शिंदे-ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठी निर्णय; गुरूवारपासून नवा अध्याय सुरू

udhav thackeray

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण विस्तारित अशा पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपविण्यात येणार आहे. येत्या गुरूवारी (ता. २५ ऑगस्ट) या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. यामुळे आता सर्वांचे लक्ष 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणी कडे लागले आहे. 

राज्यातील सत्तासंघर्ष आणि शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सोमवारी २२ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र, न्यायाधीशांच्या खंडपीठातील एक न्यायाधीश उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी मंगळवारी २३ ऑगस्टला होणार असल्याचं बोललं जात होतं. 

पण आज राज्यातील अत्यंत महत्वाच्या प्रकरणाची सुनावणी घटनापीठाकडे सोपविण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme Court) खंडपीठाने घेतला. एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांचा गट शिवसेनेपासून वेगळा झाल्यावर शिवसेना कोणाची, उध्दव ठाकरे यांची की शिंदेंची यावर चर्चा सुरू आहे. 

याचबरोबर निवडणूक आयोगाने कोर्टाच्या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत पक्षासंदर्भात आणि चिन्हासंदर्भात निर्णय देऊ नये असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता घटनापीठाच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर नेमका काय निर्णय होणार? आज यासंदर्भातल्या सुनावणीवर सकाळपर्यंत अनिश्चितता होती. 

दरम्यान, अखेर हा विषय आजच्या वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आल्यानंतर अपेक्षेप्रमाणे या प्रकरणाची सुनावणी ५ सदस्यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. या प्रकरणाची सुनावणी आता २५ ऑगस्ट रोजी होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून यावेळी नमूद करण्यात आलं आहे.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now