eknath shinde talking about tata airbus project | राज्यातील प्रकल्प गुजरातला जात असल्यामुळे विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर टीका करताना दिसून येत आहे. आता टाटा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. त्यामुळे त्यावरुनही विरोधी पक्ष सत्ताधारी नेत्यांवर टीका करताना दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही नेते टीका करताना दिसून येत आहे.
अशात सत्ताधारी नेते महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रकल्प गुजरातला गेल्याचे म्हणत आहे. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच यावरचे मौन सोडले आहे. तसेच यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला आहे.
गेल्या अडीच वर्षांमध्ये विकासकामे मंदावलेली होती. मात्र भाजप आणि बाळासाहेबांची सेना या युतीमुळे राज्यातील कामांना वेग आला आहे. ३ महिन्यांमध्ये आम्ही घेतलेल्या काही निर्णयांमुळे काही जणांची चिंता वाढली आहे. त्यांना मी कामाला लावले आहे, असे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
शेतकऱ्यांना राज्यसरकारने मदत केली आहे. भविष्यात राज्याची भरभराट होणार आहे. भविष्यात अनेक मोठे प्रकल्प राज्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना चांगले रोजगार उपलब्ध होणार आहे, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले आहे. ते नंदुरबारमध्ये बोलत होते.
गेल्या सरकारच्या काळात अनेक प्रकल्पांच्या गती मंदावल्या होत्या. त्या प्रकल्पांच्या गतीला आम्ही चालना दिली आहे. त्यामुळे काही लोकांच्या पोटात आता दुखायला लागलं आहे. ३ महिन्यात ७२ जीआर आणि ७०० निर्णयांमुळे काहींना टेंशन आलं आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या दोन तीन महिन्यात राज्यातील तीन महत्वाचे प्रकल्प गुजरातला गेल आहे. त्या तिन्ही महत्वांच्या प्रकल्पांचे काम महाष्ट्रात होणार होते. पण ते प्रकल्प गुजरातला गेले आहे. त्यामुळे विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे.
महत्वाच्या बामत्या-
Milind Narvekar : शिंदे सरकारने वाढवली मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा; धक्कादायक कारण आले समोर
Pune : पुणे तिथे काय उणे! तरुणाने पोलिसांचीच काढली चुक, दोन हजारांचे कापलेले चलन केले रद्द
Onkar Bhojane : ‘अगं अगं बाई’ हा आवाज आता महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत पुन्हा नाही ऐकू येणार..घेतली एक्झीट