Share

Eknath Shinde : धनुष्यबाण आम्हालाच मिळणार कारण निवडणूक आयोगाने हा निर्णय…; एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

eknath shinde

eknath shinde talk about shivsena symbol  | लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा मंगळवारी पार पडला. या सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महामुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. ज्याचं उत्तर एकनाथ शिंदे देताना दिसून आले.

यावेळी त्यांनी शिवसेनेत बंड करण्याची वेळ का आली? याचाही उलगडा केला आहे. शिंदेंनी बंडामागची भावनिक आणि राजकीय कारणं नाना पाटेकर यांच्यासमोर स्पष्ट केली आहे. काही गोष्टी सहन करण्याची मर्यादा असते. पण पाणी डोक्यावरुन जातं तेव्हा निर्णय घ्यावा लागतो. आम्ही जे केलं त्यामुळे आम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असं नाहीये, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

ज्यापक्षामध्ये आम्ही इतकं वर्षे काम केलं. आयुष्यभर एकनिष्ठ राहिलो. पक्षासाठी काम करत राहिलो. घरादाराचा विचार केला नाही. एकदा घरातून निघालो की परत येऊ की नाही हेही सांगता येत नव्हतं. पण जर गोष्टी डोक्याच्यावरुन जायला लागल्या की काही निर्णय हे घ्यावेच लागतात, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

पक्षाच्या प्रमुखांना निर्णय घेण्याचे अधिकार असतात. पण त्यांनी ते निर्णय पक्षातील लोकांना सोबत घेऊन घ्यायला हवे. पक्षाचं नुकसान होतंय आणि आम्ही ते वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असेल तर त्यात चुकीचं काहीच नाही. मी बाळासाहेबांचा, आनंद दिघेंचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी असं पाऊल उचललं, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

तसेच धनुष्यबाण चिन्हावर बोलताना ते म्हणाले की, आम्हाला चिन्हाबाबत बोलण्याची गरज नाही. मेरिटच्या जोरावर ते आम्हालाच मिळेल. अंधेरीच्या निवडूकीमुळे आयोगाला निर्णय घेता आला नाही. पण धनुष्यबाण आम्हालाच मिळणार. कारण ५५ पैकी ४० आमदार आमच्याकडे आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, त्या आमदारांच्या मतांची आकडेवारी ३९ लाख इतकी आहे. तसेच १२ खासदार आमच्याकडे आहे. त्यांच्या मतांची आकडेवारी ६९ लाख इतकी आहे. म्हणजेच पक्षाला मिळालेली ७० टक्के मते आमच्या बाजूने आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी टाकला सर्वात मोठा डाव! फक्त ठाकरे गटच नव्हे तर अख्ख्या मविआला फुटला घाम
BCCI ने केला सौरव गांगुलीचा अपमान, अध्यक्षपदावर कायम राहण्याची इच्छा असूनही हकालपट्टी
Rutuja latke : अंधेरी पोटनिवडणूक: ‘या’ कारणामुळे ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंचा उमेदवारी अर्ज रद्द होण्याच्या मार्गावर

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now