Share

मुंबई केंद्रशासित होणार, महाराष्ट्राचे तुकडे होणार…; एकनाथ शिंदेंचे वरळीत मोठे वक्तव्य

Eknath Shinde

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आव्हान दिलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वरळीतील सभा घेतली आहे. या सभेत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांनी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

मुंबई केंद्रशासित होणार, महाराष्ट्राचे तुकडे होणार असे आरोप राज्य सरकारवर करण्यात आले होते. त्यावरही एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं आहे. तसेच कोळीवाड्यासाठी शिंदे फडणवीस सरकार कोणती कामे करत आहे त्याची माहितीही एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

काही लोक काय काय बोलत असतात. महाराष्ट्राचे तुकडे होणार, मुंबई केंद्रशासित होणार आणि मुंबईकरांचं काय होणार असे जावईशोध हे लोक मुंबईची निवडणूक आल्यावर लावत असतात. परंतू हा एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून सांगतो की, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, या मुंबई-महाराष्ट्राची एक इंच जमीनही कोणाला घेऊ देणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

जे जायला पाहिजे होतं, घालवायला पाहिजे होतं. आम्ही सहा महिन्यांपूर्वीच ते घालवून टाकलं आहे. याचे आपण साक्षीदार आहात. त्यावेळचा मला काळ आठवतो. काही लोक म्हणायचे वरळीत येऊन दाखवा वरळीतून जाऊन दाखवा. आता हा एकनाथ एकटा आला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

काही लोक आम्हाला वरळीत येण्याचे आव्हान देत होते, पण मी एकटाच आलो आहे. तसेच हेलिकॉप्टरने सुद्धा आलो नाही तर रोडनेच आलो आहे. आम्ही संघर्ष करुन इथपर्यंत आलो आहे, असेही एकनाथ शिंदेनी या सभेत बोलताना म्हटले आहे.

मागील सरकारच्या डोक्यामध्ये सत्तेची हवा होती. त्यामुळे त्यांनी हुकूमशाही पद्धतीने कोळी बांधवांची दोन खांबांमधील अंतर वाढवण्याची मागणी फेटाळली. पण त्यानंतर सामान्यांचं सरकार आलं. किरण पावसकर आमच्याकडे हा मुद्दा घेऊन आले होते. त्यानंतर आम्ही बैठक घेतली आणि ती मागणी मान्य केली, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
थोरातांच्या राजीनाम्यानंतर अजित पवारांनी लगेचेच केला फोन; थोरात म्हणाले, दादा मला आता….
एकनाथ शिंदेंना आव्हान देणं आदित्य ठाकरेंना पडणार महागात, वरळीतील आमदारकी आली धोक्यात?
अयोध्येत खास शिळा दाखल, पण छन्नी, हतोडी चालणार नाही; संशोधक म्हणाले, ही शिळा…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now