शिवसेनेच्या ४० आमदारांचे पाठबळ मिळवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सध्या ते राज्याचा कारभारही सांभाळताना दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळणार पाठिंबा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. (eknath shinde shocking statement)
राज्यातील अनेक आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदे गटात सामील झाले आहे. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, आमदार त्यांना पाठिंबा देताना दिसून येत आहे. असे असताना आता एकनाथ शिंदे यांची नजर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांवरही असल्याचे म्हटले जात आहे.
लवकरच राष्ट्रपतीची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी भाजपने उमेदवार म्हणून द्रौपदी मूर्म यांची निवड केली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी राज्यातील २०० आमदार मूर्म यांना मतदान करतील अशी घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांवरही एकनाथ शिंदे यांचं लक्ष असल्याचे म्हटले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपतीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘मिशन २००’ हाती घेतलं आहे. सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे मिळून १७० आमदार आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण मुर्म यांना पाठिंबा देणार असे जाहीर केले होते. त्यामुळे ती संख्या आता १८५ वर पोहचली आहे.
अशात एकनाथ शिंदे यांनी मूर्म यांना २०० आमदार मतदान करतील, असा दावा केला आहे. त्यामुळे त्यांची नजर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांवरही असल्याचे म्हटले जात आहे. शिंदेंना आपला शब्द पुर्ण करायचा असेल, तर त्यांना आणखी १५ आमदारांचा पाठिंबा लागणार आहे.
शिंदे राष्ट्रपतीच्या निवडणूकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फोडणार अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, विधानसभेमध्ये काँग्रेसचे ४४ आमदार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ आमदार आहे. त्यामुळे आता कोणते १५ आमदार शिंदेंना पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
महत्वाच्या बातम्या-
सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे -एकनाथ शिंदे भेटणार; शिवसेना नेत्याच्या टि्वटमुळे खळबळ
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय घटनाबाह्य? वाचा तज्ज्ञांनी काय म्हंटलंय?
…तर आम्ही पुन्हा शिवसेनेत यायला तयार; शिवसेनेच्या बंडखोर माजी मंत्र्यांचा दावा