Share

politics : ‘कालच्या दसरा मेळाव्यात फडणवीसांनी लिहून दिलेले भाषण एकनाथ शिंदेंनी वाचून दाखवले’

politics : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंनी परंपरेनुसार दसरा मेळाव्याला शिवसैनिकांना संबोधित केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर भाजपकडून टीका करण्यात आली. आता भाजपला देखील शिवसेनेकडून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

किशोरी पेडणेकर यांनी भाजपला प्रत्युत्तर देताना म्हटले की, ‘आमचे पैसे, आमचीच भाकरी घेऊन आम्ही उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे स्वतःहून येणं आणि माणसांना आणणं, यात फरक असतो. शिंदे गटाचे दीपक केसरकर यांना भरमेळाव्यात स्टेजवर डुलक्या घेताना सगळ्यांनी पाहिले आहे. तसेच प्रत्येक घराची भांडणे चव्हाट्यावर येतात. मात्र उद्धवजींनी कधी कुटुंबीयांचा विरोध केला नाही आणि त्याचं भांडवलही केलं नाही. पण शिंदेंनी तेही केलं.’

पुढे बोलताना पेडणेकर म्हणाल्या, ‘आमची स्क्रिप्ट नव्हती. आमचा संवाद होता. आम्ही एकनाथ शिंदेंना चांगलं ओळखतो. त्यांनी केलेलं भाषण त्यांचं नव्हतं. ती स्क्रिप्ट तर तुम्ही लिहून दिली होती, असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

‘स्क्रिप्टचे भाषण लोकांना आवडत नाही. हे काल दिसून आले. उद्धव ठाकरेंच्या स्टेजवर चैतन्य होते. तर एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना लोक उठून जात होते,’ असा टोलाही पेडणेकरांनी शिंदेंना लगावला. पुढे त्या म्हणाल्या, या मेळाव्यात तर महिलांच्या जेवणाची व्यवस्था ही नीट झाली नव्हती. मुख्यमंत्र्यांनी लोकांना वेठीस धरले होते का?’ असा सवाल यावेळी किशोरी पेडणेकरांनी उपस्थित केला.

बीकेसीवर जास्त गर्दी होती असा पोलिसांचा अहवाल समोर आले,असे त्यांना विचारण्यात आल्यावर पेडणेकर म्हणाल्या की, ‘बीकेसीवर चैतन्य होतं का?, उत्साह होता का? जमलेल्या त्या गर्दीशी आम्हाला घेणं देणं नाही. आता वीस वर्षानंतर शिंदे यांना साक्षात्कार होतोय. आनंद दिघे यांच्या प्रॉपर्टीशी उद्धव साहेबांचा काहीही संबंध नाही.’ काहीही आरोप आता त्यांच्याकडून केले जात आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या मोकळ्या जागेत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. त्या ठिकाणी मद्यपान करून बाटल्या फेकण्यात आल्याचा आरोप युवा सेनेकडून झाला. त्याबाबत सुद्धा पेडणेकर म्हणाल्या, ‘उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठात जो हा प्रकार घडला. त्याबाबत कारवाई केली पाहिजे.’

महत्वाच्या बातम्या-
politics : ‘कालच्या दसरा मेळाव्यात फडणवीसांनी लिहून दिलेले भाषण एकनाथ शिंदेंनी वाचून दाखवले’
politics : शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई विद्यापीठात घाणीचे साम्राज्य; सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा ढिग
Poniyin Selvan: विक्रम वेदाच नाही तर रजनीकांतच्या चित्रपटांनाही PS-1 ने टाकले मागे, कमावले तब्बल ‘एवढे’ कोटी

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now