eknath shinde : आज दिवसभर राजकीय वर्तुळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विश्वासू असणारे मिलिंद नार्वेकर यांची जोरदार चर्चा सुरू आहे. मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याचं बोललं जातं आहे. शिंदे गटातील एका मंत्र्याने याबद्दल खुलासा केला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
याबद्दल आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे. मिलिंद नार्वेकर देखील आमच्याकडे येत आहेत, असं वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. आता फक्त धनुष्यबाण आमच्याकडे येऊ द्या यांच्याकडे १५ पैकी ५ आमदारही उरणार नाहीत, असं देखील ते म्हणाले.
याचाच धागा पकडत आता मुख्यमंत्री शिंदे यांनी एक विधान केलं आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या शिंदे गटातील प्रवाशाबद्दल बोलताना शिंदे यांनी म्हंटल आहे की, ‘मिलिंद नार्वेकर आमच्याकडे येणार की नाही माहीत नाही,’ असं म्हणतं शिंदे यांनी याबाबत उत्तर देणं टाळलं आहे.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘आज माझा वेगळा मूड आहे. मी काहीही लपवून ठेवत नाही. माझे जे आहे, ते सगळं उघडं आहे. नार्वेकर आमच्याकडे येणार की नाही माहीत नाही.’ मुख्यमंत्री शिंदे यांच्या या वक्तव्यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, पनवेल येथे शाळेतील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना शिंदे यांनी हे वक्तव्य केलं आहे. तर दुसरीकडे आता यावर ठाकरे गटातून देखील प्रतिक्रिया आलेल्या आहे. ‘मिलिंद नार्वेकर कधीच शिंदे गटात जाणार नसल्याचं औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, ‘गुलाबराव पाटील हे आमचे खास आहेत. त्यांनी सहज बोलले असेल, मिलिंद नार्वेकर कधीच जाणार नाही. तो जवळचा आहे. मातोश्रीवर काम कसे करतात, हे त्यांना हवे असेल म्हणून ते त्यांना ओढण्याचे प्रयत्न करत आहेत.
Buldhana: महाराष्ट्रात जंगलराज! मुल चोरीच्या संशयावरून तृतीयपंथीला बेदम मारहाण
Sangli: सांगलीत पालघरची पुनरावृत्ती! चार साधूंना बेदम मारहाण, धक्कादायक कारण आले समोर
सदावर्तेंना सुट्टी नाहीच! जामीन मिळताच सातारा पोलीस करणार उचलबांगडी, जाणून घ्या काय आहे प्रकरण
bjp : बारामतीत पवारांचा करेक्ट कार्यक्रम! भाजपने राष्ट्रवादीचा मोहराच फोडला, आक्रमक महिला नेत्याने हाती घेतलं कमळ