eknath shinde : काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी काही मागण्यांसाठी तीव्र आंदोलन पुकारले होते. एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओके निवासस्थानी हल्ला चढवला होता. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं होतं.
त्यानंतर ठाकरे सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांनी पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते. तसेच परब यांच्या आदेशानुसार या 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. शिवाय हल्ल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या या कमचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले होते.
तर आता ठाकरे सरकारच्या काळात बडतर्फ करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीला मुख्यमंत्री धावून आले आहेत. बडतर्फ करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत येण्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यावर अद्याप महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीये.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयानंतर मुंबई सेंट्रल एसटी मुख्यालयामध्ये आनंद व्यक्त केला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे या आनंदात अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील हे देखील यावेळी उपस्थितीत राहणार असून जल्लोष व्यक्त करणार असल्याचं बोललं जातं आहे.
दरम्यान, 8 नोव्हेंबर 2021 पासून तब्बल 6 माहीनर एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप पुकारला होता. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. धक्कादायक बाब म्हणजे या संपामुळे महामंडळाचं कोट्यवधी रूगपयांचं नुकसान झालं होतं.
महत्वाच्या बातम्या-
Vivekananda: २१ व्या शतकातील विवेकानंद ज्याला मिळाली ४ कोटींची शिष्यवृत्ती, वाचा शरद सागरबद्दल…
lucknow : ४५ मिनिटांपासून सोसायटीची अडकली होती लिफ्ट, सीसीटीव्हीमध्ये जे समोर आलं ते पाहून अंगावर येईल काटा
Shivsena : ठाण्यातील शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे ठाकरे गट एकमेकांना भिडले, तुफान राडा, शेवटी निघाला ‘हा’ तोडगा
politics : महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत दिल्लीत वेगवान घडामोडी; ठाकरेंना शेवटची २१ तासांची मुदत, अन्यथा…






