eknath shinde : शिंदे गटाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येतं आहे. शिंदे गटात वादाची ठिंगणी पडली असल्याचं बोललं जातं आहे. खरं तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या गटातून बाजूला निघालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे जोमाने कामाला लागले आहेत.
मात्र दुसरीकडे शिंदे गटातुन एक वेगळीच बातमी समोर येतं आहे. ही बातमी नक्कीच शिंदे यांना पेचात पडणारी असल्याच बोललं जातं आहे. एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या जोरदार भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सध्या एकच खळबळ उडाली आहे.
भाजपसोबत सत्ता स्थापन झाल्यापासून भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत नाराजी असल्याचं बोललं जातं आहे. अशातच आता ही बातमी समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ओवळा-माजीवाडा मतदार संघावरुन शिंदे आणि सरनाईक यांच्यात वाद झाला असल्याची बातमी समोर आली आहे.
वाचा नेमकं प्रकरण काय..?
एकीकडे राजकीय वातावरण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तापलं आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या जोरदार भांडण झालं असल्याचं बोललं जातं आहे. मात्र यावर अद्याप दोघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
मिळालेल्या माहितीनुसार, ओवळा-माजीवाडा मतदार भाजपच्या माजी आमदारासाठी सोडावा यासाठी मुख्यमंत्री शिंदेकडून दबाव टाकला जात आहे. मात्र प्रताप सरनाईक यांना हे मान्य नसल्याने दोघांमध्ये भांडण झालं असल्याचं बोललं जातं आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तसेच भाजपकडून सरनाईक यांच्या समर्थकांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरु असून त्यांना वेगवेगळी आमिषे दाखवली जात आहे, हे समजताच सरनाईक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना फोन करुन जाब विचारला. अन् त्याचवेळी दोघांमध्ये तुफान बाचाबाची झाली असल्याचं बोललं जातं आहे.
महत्वाच्या बातम्या
eknath shinde : “मुख्यमंत्री साहेब माझ्या बापाला वाचवा”, लेकीचं मुख्यमंत्र्यांना काळजाचा ठोका चुकवणार पत्र, वाचा नेमकं काय पत्रात?
Shiva temple : शिवमंदिरात घुसले चोरटे, सोने-चांदी चोरल्यानंतर दानपेटीला हात लावताच घडलं असं काही..
Optical Illusions: या फोटोत सर्वात आधी तुम्हाला काय दिसतंय? चेहरा की उंदीर? यावरून ठरतो तुमचा स्वभाव, वाचा..