eknath shinde : एक – दोन नेते नव्हे तर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा अख्खा मतदारसंघच शिंदे गटाने फोडला आहे. यामुळे ठाकरे गटाला आणखीनच धक्का बसला असल्याचं बोललं जातं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटाला अनेक धक्के बसत आहेत. त्यातील हा मोठा धक्का असल्याचं बोललं जातं आहे.
वाचा नेमकं घडलं काय?
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गट चांगलेच कामाला लागले आहेत. आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा दोन्हीही गटाकडून करण्यात येतं आहे. तर दुसरीकडे सत्तांतर होताच अनेकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातून 500 कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले आहेत. वरळी कोळीवाड्यातून जवळपास 500 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली असून उद्धव ठाकरेंसमोर आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
विशेष बाब म्हणजे, मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत कोळीबांधव वर्षा या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा सोहळा पार पडला. तर दुसरीकडे शिवसेनेचे पहिले आमदार देखील शिंदे गटात सामील होणार असल्याचं बोललं जातं आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना आणखी एक धोका बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे पहिले आमदार दिवंगत वामनराव महाडीक यांच्या सुकन्या हेमांगी वामनराव महाडीक मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे ठाकरे गटात आणखीनच खळबळ उडाली आहे.
Buldhana: महाराष्ट्रात जंगलराज! मुल चोरीच्या संशयावरून तृतीयपंथीला बेदम मारहाण
Sangli: सांगलीत पालघरची पुनरावृत्ती! चार साधूंना बेदम मारहाण, धक्कादायक कारण आले समोर
सदावर्तेंना सुट्टी नाहीच! जामीन मिळताच सातारा पोलीस करणार उचलबांगडी, जाणून घ्या काय आहे प्रकरण
bjp : बारामतीत पवारांचा करेक्ट कार्यक्रम! भाजपने राष्ट्रवादीचा मोहराच फोडला, आक्रमक महिला नेत्याने हाती घेतलं कमळ