शिवसेनेचे ‘हे’ ४ मंत्री आणि १७ आमदार गायब; बंडखोर आमदार आणि मंत्र्यांची नावे झाली उघड

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेत भूकंप होणार असल्याच आता स्पष्टच पाहायला मिळत आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नारजीमुळे आता शिवसेनेत खळबळ उडाली आहे. शिंदे हे 17 आमदारांसह सुरतमध्ये एका हॅाटेलमध्ये असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

तसेच विधान परिषदेच्या निकालात भाजपाने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का दिला असताना शिवसेना नेते शिंदे बेपत्ता झाले असल्याने राजकीय भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे संपर्काबाहेर असल्याने त्यांनी बंड पुकारल्याच्या चर्चांना आता राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.

मिळालेल्या महितीनुसार, शिंदे यांच्यासोबत मध्यरात्री पोहोचलेल्या आमदारांमध्ये महेंद्र थोरवे, भारत गोगावले, महेश शिंदे, विश्वनाथ भोईर, ज्ञानराज चौगुले, संजय राठोड, श्रीनीवास वनगा, संजय गायकवाड, संजय रायमूलकर हे आमदार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

तर दुसरीकडे राज्यमंत्री अब्दुल सत्तार, बालाजी किणीकर, शांताराम मोरे, अनिल बाबर, तानाजी सावंत, संजय शिरसाठ हे देखील एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच एकनाथ शिंदेंसह सेनेचे 17 आमदार बंडाच्या तयारीत असल्याच बोललं जातं आहे.

दरम्यान,  गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्याप संपर्क होऊ शकला नाही.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. आज दुपारी शिंदे हे सूरतमध्येच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. यामुळे शिंदे यांच्या राजकीय भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
भाजपकडून एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर? राजकीय घडामोडींना आला वेग
संध्याकाळी आम्ही पक्ष कार्यालयात जमलो तेव्हा शिंदे..;सेना नेत्याने सांगीतलं नेमकं काय घडलं
विधान परिषदेचे मतदान सुरु असतानाच एकनाथ शिंदेनी केलं प्लॅनिंग, धक्कादायक माहिती समोर
एकनाथ शिंदेंना फोन केला तर ऐकू येतेय गुजराती भाषेतील टोन, १३ आमदारांसह शिंदे गुजरातमध्ये?