शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिंदे गटासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. (eknath shinde new party name)
एकनाथ शिंदे यांच्या या मोठ्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. सध्याची स्थिती पाहता भविष्यातील अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा वाढत चालला आहे. त्यामुळे ते पुन्हा येतील याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीये.
अशात काही जाणकारांच्या मते एकनाथ शिंदे सोबत असलेल्या आमदारांसोबत एकनवीन पक्षस्थापन करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेबांची सेना हे शब्द मोठ्या प्रमाणात वापरताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्याशी संबंधितच काही नाव असेल, असे म्हटले जात आहे.
बाळासाहेबांविषयी आणि त्यांना अभिप्रेत असलेल्या हिंदुत्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिंदे ‘बाळसेना’ अशा नावाने स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची शक्यता आहे. आम्हीच कट्टर शिवसैनिक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्नही या मार्गाने केला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खुप प्रयत्न केले पण ते एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांची समजूत काढण्यात अपयशी ठरले. हे सगळं पाहून अखेर उद्धव ठाकरेंनी बुधवारी रात्री वर्षा बंगला सोडला आहे. त्यांनी पुन्हा मातोश्रीला जाण्याचा निर्णय घेतला आणि वर्षा ते मातोश्रीचा ९ किलोमीटरचा पल्ला २ तासांत गाठला.
यावेळी हजारो शिवसैनिक जमले होते. शिवसैनिकांचे अफाट प्रेम पाहून प्रत्येकजण थक्क झाला. पण या सर्व प्रकारामुळे राष्ट्रवादीचे मंत्री मात्र नाराज झालेले पाहायला मिळाले. रात्री ९ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी बैठक पार पडली. यावेळी त्यांनी वर्षा बंगला सोडला म्हणून अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरेंसाठी ममता बॅनर्जी मैदानात? गुवाहाटीतील हॉटेलवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांची धडक
महाराष्ट्राचा पाॅलीटीकल ड्रामा आसामात नको, आमदारांना महाराष्ट्रात हाकला; गुवाहाटीत आंदोलन
डोळ्यात अश्रू आणत एकनाथ शिंदे बोलले, ‘उद्धवजी मी कसं काय बंड करेल?’; आणि त्यानंतर….