निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत शिवसेनेचे चिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिले आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरेना मान्य नसल्यामुळे त्यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
शिवसेनेचे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना भवन आणि पक्षाच्या शाखांवर देखील एकनाथ शिंदे दावा करतील असे म्हटले जात आहे. विधीमंडळातील ताबा शिवसेनेने घेतल्यामुळे आता शिवसेना भवन देखील शिंदे गट ताब्यात घेणार असल्याची चर्चा आहे.
अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत सांगितले आहे. आम्ही शिवसेनेच्या कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
आम्ही कोणाच्याही कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही. आम्हाला त्याची गरज नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेत आहोत. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही मालमत्तेवर आम्ही दावा करणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांचे विचार पुढे न्यायचे आहे. हीच आमची संपत्ती आहे. त्यामुळे आम्हाला काहीही नकोय. तुम्हाला कोणी काहीही सांगितले असेल तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. मी अधिकृतपणे सांगतो, आम्ही कोणत्याही संपत्तीवर दावा करणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्यामुळे खुप आनंदी आहे. लोकशाही आणि भारतीय घटनेचा हा विजय आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर दिली होती.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून मी १२ आमदारांच्या यादीवर सही केली नव्हती; भगतसिंग कोश्यारींचा मोठा खुलासा
उद्धव ठाकरेंना पुन्हा मिळणार शिवसेनेचे नाव आणि चिन्ह? सर्वात मोठे कारण आले समोर
मोठी बातमी: संजू सॅमसन निवृत्तीच्या तयारीत, BCCI ने वारंवार दुर्लक्ष केल्याने घेतला मोठा निर्णय