Share

शिंदेंना ‘ती’ चूक पडणार महागात? सुप्रीम कोर्टात ‘या’ मुद्द्यावर ठाकरे गटाने पकडलं कोंडीत

uddhav thackeray eknath shinde

बुधवारी सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुनावणी झाली. या सुनावणीत ठाकरे गटाने युक्तिवाद केला आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तासंघर्षात एक चुक केल्याचे समोर आले आहे. ती चूक एकनाथ शिंदे यांना महागात पडू शकते असे म्हटले जात आहे.

ठाकरे गटाकडून बजावण्यात आलेल्या व्हिपचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं नव्हतं. ती चूक एकनाथ शिंदे यांना भोवण्याची शक्यता आहे. सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांना व्हिप बजावला होता. बैठकीला बोलावलं होतं. पण एकनाथ शिंदे त्या बैठकीला आले नव्हते.

सुनील प्रभू यांनी अधिकृत मेलवरुन २२ जून रोजी व्हिप बजावला होता. पण एकनाथ शिंदे बैठकीलाच आले नव्हते. तसेच बैठकीला का आले नाही? याचे उत्तरही एकनाथ शिंदे यांनी दिले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी व्हिपचं उल्लंघन केल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.

एकनाथ शिंदेंनी व्हिपला उत्तर देणं गरजेचं होतं. ते बैठकीला उपस्थित नव्हते, तसेच त्यांनी त्यावर काही उत्तरही दिले नाही. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतेपदावरुनही  कपिल सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंनी नेतेपदी निवड केली होती. राष्ट्रीय कार्यकारिणीत एकनाथ शिंदे चौथ्या क्रमांकाचे नेते होते. उद्धव ठाकरेंनी काही नेत्यांची निवड केली होती. तर काही निवडणूक आले होते. पक्षाचे सर्व निर्णय उद्धव ठाकरे घेत होते. त्याचे सर्व अधिकार आमदारांनी ठाकरेंना दिले होते.

२०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी उद्धव ठाकरेंनी निवड केली होती. तर सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून निवड केली होती. पण शिंदे गटाच्या बंडानंतर एकनाथ शिंदेंची गटनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आणि गटनेतेपदी अजय चौधरी यांची निवड करण्यात आली.

वर्षावर एक बैठक बोलवण्यात आली होती, तिथे याबाबत निर्णय झाल्याचे कपिल सिब्बल यांनी सांगितले. विधासभा उपाध्यक्षांना कागदपत्रे देण्यात आली होती. त्यांनी निर्णय मान्य केला होता याकडेही सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे न्यायालय आता त्यावर काय मत नोंदवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या-
सुप्रीम कोर्टही शिंदे गटाच्या बाजूनेच देणार निकाल? सरन्यायाधीशांनीच दिले संकेत, म्हणाले..
चिंचवड निवडणूकीत तुफान राडा; शिंदेंच्या रॅलीपुढेच ठाकरे गटाच्या शहरप्रमुखांना जीवघेणी मारहाण
IPL आधीच आले दिनेश कार्तिकचे वादळ! 11 चेंडूत कुटल्या 56 धावा; ठोकला टीम इंडियात वापसीचा दावा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now