राज्यातील राजकीय घडामोडींचे पडसाद हे गणेशोत्सवात देखील उमटताना पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांचा गट शिवसेनेपासून वेगळा झाल्यावर शिवसेना कोणाची, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची की एकनाथ शिंदेंची यावर सध्या चर्चा सुरू आहे.
यावरून आता गणेशोत्सवात देखील वादाची थणगी पडली आहे. कल्याणमधील (Kalyan) एका मंडळात बहुतांश शिवसैनिक असून या शिवसैनिकांनी पक्ष निष्ठतेवर गणेश मंडळाचा देखावा साकारण्याचा निर्णय घेतला. त्यांची तयारीही पूर्ण झाली होती. मात्र पोलिसांनी कारवाई केली.
वाचा नेमकं घडलं काय?
यंदाचे कल्याण मधील विजय तरुण मंडळाचे 59 वे वर्ष आहे. या वर्षी मंडळाने अनोख्या पद्धतीने देखावा करण्याचा निर्णय घेतला. मंडळात बहुतांश शिवसैनिक असून या शिवसैनिकांनी पक्ष निष्ठतेवर गणेश मंडळाचा देखावा साकारला. पक्षनिष्ठा हा या देखाव्याचा विषय होता.
मात्र या देखाव्याला पोलिसांनी आक्षेप घेतला. पोलिसांनी हा देखावा जप्त केला आहे. पहाटेच्या सुमारास पोलीस ताफा आला आणि मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे सणासुदीच्या काळात काहीकाळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.
दरम्यान, या प्रकरणावर बोलताना मंडळाचे विश्वस्त आणि शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांनी म्हंटलं आहे की, ही एक प्रकारे हिटलरशाही आहे. तिचा आम्ही निषेध करतो. मंडळाने काहीही वादग्रस्त दाखवले नव्हते, तर ताज्या विषयावर भाष्य केले होते. तरीही देखावा जप्त करण्यात आला आहे.’
कसा होता देखावा?
शिवसेना त्याग आणि शौर्याचा इतिहास आहे. शिवसेना आहे म्हणून नवा इतिहास घडणार आहे. शिवसेना ही कोणाच्या जीवावर आहे तर शिवसैनिकांच्या जीवावर आहे हे दाखविण्याचा प्रयत्न कल्याण मधील विजय तरुण मंडळाने आपल्या गणेशोत्सव देखाव्यातून केला होता. मात्र पोलिसांनी कारवाई करत देखावा जप्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बंडखोर आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने सांगितली ‘अंदर की बात’
उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार म्हणणारे माजी खासदार शिंदे गटात सामील
Asia Cup: काय आहे जय शहा आणि तिरंगा वादाचे संपूर्ण सत्य? भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान असं काय घडलं?
PHOTO: २९ व्या वर्षी चित्रपटात पदार्पण, १७ वर्षात १० चित्रपट, आता ४६ व्या वर्षी केले बोल्ड फोटोशूट