रामदेवबाबा(Ramdev Baba): सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू रामदेवबाबा यांची भेट घेतली. यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. ही चर्चा चालू असतानाच आज (मंगळवार) सकाळी १० वाजताच्या दरम्यान रामदेवबाबा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भेट घेण्याकरिता ते एकनाथ शिंदे यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यावर गेले होते.
योगगुरू रामदेव बाबा हे योगगुरू सोबतच पतंजली आयुर्वेद कंपनीचे संस्थापक आहेत. जंतर मंतर येथे अण्णा हजारे यांच्यासोबत झालेल्या अन्नत्याग सत्याग्रहात ते सहभागी झाले होते. जगभरात योग प्रसारक म्हणून त्यांना ओळखले जाते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेव बाबांच्या भेटीचे फोटो ट्विटर हँडलवर पोस्ट केले आहेत. यावरुनही राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावण्यात येत आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर रामदेव बाबांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची स्तुती केली. ते म्हणाले की, आम्ही इथे मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्याकरिता आलो होतो. पुढे ते म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरूष आहेत. आपल्या राजधर्मासोबत ते आपल्या सनातन धर्म आणि ऋषीधर्माचं प्रामाणिकपणे पालन करत आहेत.
बाळासाहेब ठाकरेंशी आमचे स्नेहसंबंध होते. एकनाथ शिंदे हे त्यांचे मानस आध्यात्मिक आणि राजकीय वारसदार आहेत असं आम्हाला वाटतं. या राजधर्मासोबत सनातन धर्माच्या प्रतिष्ठेबाबत आम्ही चर्चा केली. फार चांगलं वाटलं.” योगगुरू रामदेवबाबा यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आधीपासूनच त्यांच्यात शिवसेना कुणाची याबाबत वाद सुरु आहे. हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचला आहे. अशातच रामदेव बाबांनी एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार म्हटल्याने हा वाद वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची रामदेवबाबा यांच्यासोबत एकापाठोपाठ भेट झाल्याने याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. याबाबत सोशल मीडियावरही नेटकरी अनेक कमेंट्स करत आहे.
महत्वाच्या बातम्या
Shubhaman Gill: सारा तेंडुलकरला नाही तर सारा अली खानला डेट करतोय शुभमन गिल; थेट पुरावेच आले समोर
MNS : दसरा मेळाव्यावरून शिवसेना-शिंदे गटाला मनसेने सुनावले, ट्विट करत म्हणाले,”वारसा हा वास्तूचा नसून….
‘उद्धव ठाकरेंना सांगोल्यात बंगला भाड्याने घेऊन देतो, फक्त..’, शहाजीबापूंनी दिलं ओपेन चॅलेंज
काॅंग्रेसला आजवरचे सर्वात मोठे भगदाड; उपमुख्यमंत्र्यासह तब्बल ५१ बडे नेते राजीनामा देणार