मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेत्यांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे वेगवेगळ्या नेत्यांना पक्षात प्रवेश देत आहे. अशात आदित्य ठाकरेंनी ठाण्यात येऊन एकनाथ शिंदेंना निवडणूक लढण्याचे आव्हान दिले होते. पण आता शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना वरळी मतदार संघातच धक्का देण्याची तयारी सुरु झाली आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी एक मोठे वक्तव्य केले होते. आदित्य ठाकरे यांच्या विजयात महत्वाची भूमिका निभावणारे सचिन आहिर आणि सुनील शिंदे हे शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा त्यांनी केला होता.
संजय शिरसाट यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळाच चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे वेगवेगळे तर्कवितर्कही लावले जात आहे. पण शिरसाट जे बोलले तसे झाले तर तो आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे.
आदित्य ठाकरे यांना सगळे कटांळले आहे. सुनील शिंदेंच नाही, तर सचिन आहिर सुद्धा शिंदे गटात येऊ शकतात. वरळी मतदार संघात सचिन आहिर आणि सुनील शिंदे यांची मोठी ताकद आहे. त्या दोघांच्या जीवावरच आदित्य ठाकरे निवडून आले आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
आता ते सगळे आदित्य ठाकरेंना कंटाळले आहे. उद्या सचिन आहिर यांनीदेखील शिंदे गटात यायला हरकत नाही. ते शिंदे गटात आले तर त्यांचे स्वागतच केले जाईल, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिरसाटांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या आधी सुनील शिंदे यांनी वरळीमध्ये विजय मिळवला होता. तसेच याच मतदार संघात सचिन आहिर यांना पाठिंबा देणाराही मोठा वर्ग आहे. २०१९ च्या निवडणूकीत सुनील शिंदे यांची समजूत काढत आदित्य ठाकरेंना उमेदवारी दिली होती. पण आता शिंदे आणि आहिर हे दोघेही जर शिंदे गटात गेले तर आदित्य ठाकरेंना ते आव्हान देणारे ठरतील.
महत्वाच्या बातम्या-
बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालाय प्रभास, सेटवरच केलं होतं प्रपोज; अभिनेत्री म्हणाली…
शिवसेनेच्या नावावर आणि चिन्हावर निवडणूक आयोगाचा हैराण करणारा निर्णय, ठाकरेंना दिलासा तर शिंदेंना धक्का
अदानींसाठी आता सेहवाग मैदानात; हिंडेनबर्गची चिरफाड करत म्हणाला, गोऱ्या लोकांना भारताची…