Share

शिंदे गटाची वाटचाल भाजपमध्ये विलीन होण्याच्या दिशेने? भावना गवळींच्या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा

bhavnaa gavli

राज्यात शिंदेशाही पर्वास सुरुवात झाली आहे. राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अख्खं ठाकरे सरकार कोसळलं. 

याचबरोबर शिंदे यांनी बंड केल्यानंतर एकेकाळी एकमेकांच्या सोबत काम करणारे आता एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहेत. सत्तेत असून देखील अनेक जवळच्या व्यक्तींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. शिवसेनेला लागलेली गळती थांबविण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे जोमाने कामाला लागले आहेत. 

मात्र दुसरीकडे शिंदे यांच्या गटाला समर्थन वाढताना पाहायला मिळत आहे. आमदार, खासदारांपाठोपाठ नगरसेवक देखील मोठ्या प्रमाणात शिंदे गटाकडे वळू लागले असल्याने आता आणखीनच शिवसेनेला धक्का बसत आहे. काही दिवसांपूर्वीच वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात सामील होणे पसंत केले.

भावना गवळी यांनी देखील शिंदे गटाला साथ दिल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असल्याच बोललं जातं आहे. तर आता चर्चा आहे त्यांच्या एका बॅनरची..! नुकतच भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंना रामराम ठोकला आहे. तर आता २३ ऑगस्ट रोजी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी खासदार गवळी यांनी वाशिममध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं आहे. 

दरम्यान, या मेळाव्याच्या प्रचारासाठी शहरात लावलेल्या बॅनर्सवर शिवसेनेचे कमी अन् भाजपच्या नेत्यांचेच फोटो जास्त आहेत. विशेष बाब म्हणजे, या बॅनरवर भावना गवळी वगळता वाशिम जिल्ह्यातील एकाही शिवसेना पदाधिकाऱ्यांचा फोटो नाही.यामुळे आता अख्खा शिंदे गट भाजपच्या वाटेवर आहे का? अशी चर्चा सध्या जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

काही महिन्यांपूर्वीच माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्या संस्थेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रर केली होती. सोमय्या यांनी तक्रार केल्यानंतर ईडीने त्यांच्याविरोधात कारवाई केली होती. मात्र तेव्हापासून खासदार गवळी मतदारसंघातच आल्या नव्हत्या. आता तब्बल वर्षाने त्या मतदारसंघात आल्या आहे. 

महत्वाच्या बातम्या
Cricketer: एकेकाळी होता स्टार क्रिकेटपटू, आता रिक्षा चालवून भरतोय पोट, कहाणी वाचून डोळे पाणावतील 
security : देशाच्या सुरक्षेलाच नख, मोठा घोटाळा उघड; अनेक बडे अधिकारी अडकणार
आगामी निवडणुकांसाठी दृष्टीने राज ठाकरे ऍक्टिव्ह; नाराज वसंत मोरेंना दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
Shambhuraj Desai : काहीही झालं तरी गद्दार शंभुराज देसाईंना पाडणारच; शिवसेनेच्या वाघाने फोडली डरकाळी

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now