Share

Ekanth Shinde : शिंदे मर्द आहेत, तसले बायकी धंदे उद्धव ठाकरेच…; शिंदेगटाचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Eknath Shinde Uddhav Thackeray

eknath shinde group angry on uddhav thackeray  | अंधेरी पुर्वच्या पोटनिवडणूकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेतले आहे. तसेच त्यांनी आपले चिन्ह मशाल असे घेतले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने बाळासाहेबांची शिवसेना असे नाव घेतले आहे. तसेच त्यांचे चिन्ह हे ढाल आणि तलवार असे आहे.

तसेच निवडणूकीत ठाकरे गटाकडून लढणाऱ्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा निवडणूक अर्ज भरण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून शिंदे गटावर आरोप केले आहे.ऋतुजा लटके या महापालिकेत लिपीक म्हणून कार्यरत होत्या. पण त्यांनी महिनाभरापूर्वी राजीनामा दिला होता. असे असले तरी त्यांचा राजीनामा अजून स्वीकारण्यात आलेला नाही.

राजीनामा मंजूर न करण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बालसिंग यांच्यावर सरकारकडून दबाव टाकल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना आता शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी ठाकरे गटाला सुनावले आहे.

दबाव आणण्यासाठी हे काय कोविडमधील टेंडर आहे का? सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. एखाद्याला कामावर ठेवण्यासाठी दबाव आणला जात असेल, तर समजू शकतो. पण एखाद्याचा राजीनामा स्वीकारु नये यासाठी दबाव आणल्याचे पहिल्यांदाच समोर आले आहे, असे पावसकर यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रत्येकवेळी सहानभूसाठी वेगवेगळ्या गोष्टी करायच्यात. त्यातून पुन्हा आपलं राजकारण सुरु करायचं. ज्या रमेश लटकेंनी शिवसेनेसाठी काम केल, त्यांना तुम्ही शिंदेंकडे गेला होता का? असं विचारणं चुकीचं आहे. ऋतुजा लटके आणि एकनाथ शिंदे यांची कोणतीही भेट झाली नसल्याचे यावेळी पावसकर यांनी स्पष्ट केले आहे.

किरण पावसकर यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना देखील सुनावले आहे. ते म्हणाले की, एखाद्या आमदाराच्या पश्चात त्याच्या पत्नीला आपल्याकडे बोलवण्याचे घाणेरडे राजकारण शिंदे कधीच करणार नाही. एकनाथ शिंदे मर्द आहेत. ते ४० लोकांना घेऊन गेले आणि मुख्यमंत्री झाले. एका महिलेला बोलवून ते असले धंदे करणार नाही. उद्धव ठाकरेंना असले बायकी धंदे शोभतात.

महत्वाच्या बातम्या-
wedding ceremony : नवरीच्या मागून आला प्रियकर, तिच्या भांगेत ५ वेळा सिंदूर भरून केलं असं काही की वाचून धक्का बसेल
rutuja latake  : ऋतुजा लटकेंविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल, त्यामुळे राजीनामा स्वीकारत नाहीये; पालिकेचा अजब दावा
Har har mahadev : साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीही झाला हर हर महादेवचा फॅन, म्हणाला, मला खुप…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now