अमित शाह(Amit Shah): केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे जाणार नाहीत या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले होते. पण नंतर अमित शाह यांच्या आग्रहास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शासकीय कार्यक्रमात बदल केल्याची चर्चा सुरू आहे.
अमित शाह सोबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघेही लालबागच्या राजाच्या दर्शनाला उपस्थित होते. आज शिक्षक दिन असल्याने मुख्यमंत्री हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. दुपारी साडेतीननंतर ते गणेशोत्सवानिमित्त काही ठिकाणांना भेटी देणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
आधी ठरल्यानुसार एकनाथ शिंदे शिक्षक दिनानिमित्त राज्यातल्या शिक्षकांशी संवाद साधणार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा जाहीर केलेल्या आपल्या शासकीय कार्यक्रमांमध्ये अमित शाह यांच्यासोबतच्या लालबागचा राजाच्या दर्शनाबद्दल लिहलेले होते. आधीच्या कार्यक्रम यादीनुसार १०.३० वाजता अमित शाह यांच्यासोबत लालबागचा राजाचे दर्शन घेणे.
त्यानंतर ११.११ वाजता त्यांच्या सोबतच वांद्र्यात गणेशदर्शन आणि मग १२ वाजता राज्यातल्या शिक्षकांशी संवाद असे नमूद केले होते. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुधारित कार्यक्रमात अमित शाह सोबतच्या दौऱ्याबद्दल नमूद केलेले नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शाहांसोबत लालबागचा राजाच्या दर्शनाला जाणार नाही, अशा राजकीय वर्तुळात चर्चा होत्या.
मग अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शाह यांच्यासोबत लालबागचा राजाच्या दर्शनाला गेलेले दिसून आले. त्यामुळे अमित शाह यांच्या अति आग्रहामुळे शिंदेंनी आपल्या दौऱ्यात बदल केल्याच्या चर्चा चांगल्याच रंगू लागल्या आहेत. दुपारी अमित शाह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचतील, तेथे त्यांची बैठक आणि भोजन होईल.
गृहमंत्री शाह दुपारी 2.15 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचतील आणि येथेही गणेशाचे दर्शन आणि पूजा करतील. दुपारी 3.30 वाजता शाह पवईतील एल अँड टी कॅम्पसमध्ये नायर चॅरिटेबल ट्रस्टच्या शाळेचे उद्घाटन करतील. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुका या महिन्यात किंवा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. बीएमसीवर सध्या शिवसेनेचे नियंत्रण आहे. बीएमसी ही श्रीमंत महापालिका समजली जाते. शाह बीएमसी निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या नेत्यांशी पुढील रणनीतीवर चर्चा करू शकतात.
महत्वाच्या बातम्या
Shivsena : अमित शाहांच्या टीकेला शिवसेनेचे प्रत्युत्तर, म्हणाले, “ते काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच….
Kangana Ranaut : महेश भट्ट यांचे खरे नाव अस्लम, त्यांनी लग्नासाठी धर्म बदलला; अभिनेत्रीचा धक्कादायक गौप्यस्फोट
Uddhav Thackeray : बाटग्यांच्या शिंदे गटाने घ्यायला दसरा मेळावा म्हणजे काय सुरती बाजारबुणग्यांचा मेळा आहे का?
Arshdeep Singh : अर्शदीप सिंगला खलिस्तानी संबोधणाऱ्या पाकीस्तानची घाणेरडी चाल झाली उघड; जगभरातून निषेध