Share

devendra fadnavis : शिंदे-फडणवीसांमधील वाद चव्हाट्यावर! ‘या’ कारणामुळे फडणवीस नाराज, वाचा नेमकं काय घडलं?

Eknath Shinde Devendra Fadanvis

devendra fadnavis : शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात चांगलेच सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे. दोघेही राज्यात दौरे, बैठका घेतं आहेत. अख्खा महाराष्ट्र दोघांनी पिंजून काढला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री कार्यकर्त्यांशी बातचीत करत आहेत. मात्र असं असलं तरी देखील मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात अनेकदा वादाची ठिणगी पडली असल्याच पाहायला मिळालं आहे. शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचं सांगितलं जातं.

मात्र असं असलं तरी देखील अनेकदा शिंदे सरकारमधील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आलं आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, पुन्हा एकदा सरकारमधील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आलं आहे. मुख्यमंत्री वेळ पाळत नाहीत म्हणून फडणवीस रूसले, असल्याचं बोललं जातं आहे.

यामुळे पुन्हा एकदा शिंदे – फडणवीसांमद्धे वादाची ठिणगी पडली असल्याच पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  रविवारी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे तीन कार्यक्रम एकत्र होते. मात्र एकाही कार्यक्रमाला मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री हे दोघे एकत्र आले नाहीत.

मिळालेल्या महितीनुसार, नियोजित तीन कार्यक्रम टाळून एकनाथ शिंदे ठाण्यातल्या एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेले. विशेष बाब म्हणजे अख्खा दिवस मुख्यमंत्री शिंदे ठाण्यात होते. एवढच नाही तर पुढे फडणवीस ठाण्यातल्या कार्यक्रमाला तातडीने आले.

मात्र नेहमीप्रमाणे तिथे देखील एकनाथ शिंदे हे नव्हते. यामुळे आता या दोघांमधील मतभेदांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार येऊन आता 3 महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर दुसरीकडे मुख्यमंत्री वेळ पाळत नसल्याच देखील बोललं जातं आहे.

महत्वाच्या बातम्या-
devendra fadanvis : फडणवीसांच्या खेळीमुळे आशिष शेलारांचा झाला गेम, भाजपने माघार घेतल्यामुळे पडले तोंडघशी
Sanjay Raut : माघार घेतली नसती तरी आम्ही जिंकलोच असतो, राऊतांनी थेट तुरूंगातून सांगीतला मताधिक्याचा आकडा
Shakti Kapoor : अभिनेत्रीचे शक्ती कपूरवर गंभीर आरोप, म्हणाली, बोल्ड सीन करताना तो एवढा उत्तेजीत झालता कि….

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now