Share

वेदांता प्रकल्प पुन्हा राज्यात येणार! विरोधकांच्या टीकेपुढे सरकार नमले; मुख्यमंत्री शिंदेंचा थेट पंतप्रधानांना फोन

eknatha shinde

राज्याचं राजकारण सध्या वेगळ्याच मुद्यावरून चांगलच तापलं आहे. फॉक्सकॉन प्रकल्पावरून आता राजकारण चांगलचं तापलं आहे. कालच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी  महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प भाजपमुळे गुजरातमध्ये गेल्याचा आरोप केला.

यामुळे आता हे प्रकरण आणखीच चिघळलं आहे. तर आता शिंदे सरकार आता चांगलचं कामाला लागलं आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन बातचीत केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या पार्श्वभूमीर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदींना विनंती केली आहे की, ‘महाराष्ट्राला उद्योग-प्रकल्प आणि गुंतवणुकीबाबत सहकार्य करा.’  यामुळे आता पुन्हा महाराष्ट्रात फॉक्सकॉन प्रकल्प येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाचा काय आहे प्रकरण..?
नुकताच शिंदे – फडणवीस सरकारने फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत एक निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारने फॉक्सकॉन प्रकल्पावर ९० टक्के चर्चाही केली होती. याचबरोबर फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता.

यातून महाराष्ट्रात रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. तब्बल या प्रकल्पातून १ लाख रोजगार निर्माण होणार होते. मात्र शिंदे – फडणवीस सरकारने हा प्रकल्प गुजरात राज्यात गेला आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. विरोधकांनी शिंदे सरकारला घेरले आहे.

“शिंदे सरकार हे खोके सरकार आहे. जीत के हारने वालो को खोके सरकार कहते है”, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्राबाहेर गेली. महाराष्ट्रात येणारी कंपनी शेवटच्या मिनिटाला गुजरातला निघून गेली. ती का निघून गेली?”, असा सवाल आदित्य ठाकरेंनी काल उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या

भाजपचा बडा नेता पवारांच्या भेटीसाठी थेट ‘सिल्व्हर ओक’वर; वाचा नेमकं बंद दाराआडं काय घडलं?
CM शिंदेंच्या हस्ते सरन्यायाधीशांचा सत्कार झाल्याने वाद; उज्ज्वल निकम म्हणाले, आत्तापर्यंतच्या प्रघातानुसार..
धावत्या कारने महामार्गावर घेतला पेट, भरपावसात गाडीतून CM शिंदे उतरले, म्हणाले, ‘गाडी आपण नवी घेऊ, काळजी करू नकोस’
प्रभादेवीतील वाद चिघळणार? शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांविरोधात पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, वाचा नेमकं काय घडलं?
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now