राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्याप संपर्क होऊ शकला नाही. (eknath shinde at surat with 13 mla)
अशात एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आता एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता महाविकास आघाडीसह शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याच बोललं जातं आहे.
तसेच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता गुजराती भाषेतील टोन ऐकू येत आहे. त्यामुळे ते गुजरातमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ आमदार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर आणि आमश्या पाडवी यांचा विजय झाला आहे. मात्र सचिन आहिर वगळता शिवसेनेच्या एकाही बड्या नेत्याने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे एकनाथ शिंदे सोमवार रात्रीपासून नोट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे आणि काही आमदार नॉट रिचेबल असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मोठे पाऊल उचलले. त्यांनी लगेचच वर्षा बंगल्यावर सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. त्यामुळे मुंबई आणि तिथल्या जवळच्या सर्व आमदारांनी रात्रीच बंगल्यावर हजेरी लावली.
मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरु होती. शिवसेनेतील ही मोठी बाब कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर पोहोचल्या. रात्री उशिरापर्यंत एकनाथ शिंदे आणि बाकी आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात होता, अशी माहितीही समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
काही आमदारांना परत यायचं आहे पण त्यांना नजरकैदैत ठेवलंय; शिवसेनेचा भाजपवर गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंसोबत संपर्क झालाय..; हाय होल्टेज ड्राम्यानंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रीया
विधान परिषद! भाजपच्या ‘प्लॅन’वर फिरले पाणी! पहिला निकाल आला; एकनाथ खडसे विजयी