eknath shinde angry on supriya sule | राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. त्यामुळे राज्यात याचे तीव्र पडसाद उमटले आहे.
अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच माफी मागण्याची मागणी केली आहे. अब्दुल सत्तारांच्या विधानानंतर अनेक नेते यावर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. सत्तारांच्या या वक्तव्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवरही टीका केली जात आहे.
आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी अब्दुल सत्तार यांचे कान टोचल्याचीही माहिती मिळत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी सत्तारांना फोन करुन सुप्रिया सुळे यांची तातडीने माफी मागा, असे आदेशही दिले आहे.
अब्दुल सत्तार यांनी टीका केल्यामुळे राज्याचे वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे नेतेही यामुळे चांगलेच तापले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आमदारांची बैठक बोलावली. त्यामध्ये या वादाला कशाप्रकारे हाताळायचे आणि वाद शांत करण्यासाठी काय केले पाहिजे यावर चर्चा झाली आहे.
अब्दुल सत्तारांनी सोमवारी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद अशा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलने केली. तसेच मुंबईत अब्दुल सत्तारांच्या घरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोहचले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा विद्या चव्हाण या सुद्धा खुप आक्रमक झाल्या आहे. त्यांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जोपर्यंत अब्दुल सत्तार राजीनामा देत नाही, तोपर्यंत एकनाथ शिंदे यांना आम्ही मंत्रालयात आणि वर्षा बंगल्यावर स्वस्थ बसू देणार नाही, असे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Mumbai : पतीच्या मृत्यूची माहिती मिळताच पत्नीनेही सोडले प्राण, मुंबईतील हृदयद्रावक घटना
हातात तिरंगा अन् डोळ्यात अश्रू.. मैदानात आलेल्या चाहत्यासोबत रोहीतने केली सर्वांची मनं जिंकणारी गोष्ट
10 टनांहून अधिक सोने, 15900 कोटींची रोकड, तिरुपती मंदिराच्या एकून संपत्तीचा आकडा ऐकून डोळे फिरतील