eknath shinde angry on rebel mla | भाजपशी हात मिळवणी करत एकनाथ शिंदे यांनी राज्यात सरकार स्थापन केले आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भुमिका घेताना दिसून येत नाहीये. इतकंच नाही, तर त्यांनी आता ठाकरे कुटुंबावर टीका करणाऱ्यांनाच सुनावले आहे.
नको त्या विषयात नको तेवढे बोलू नका, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना सुनावले आहे. आपल्या गटातील आमदारांना आवरण्यासाठी शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचे म्हटले जात आहे.
शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिवसेना नेते आणि बंडखोर आमदार एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहे. हा वाद टोकाला जात आहे. बंडानंतर एकनाथ शिंदे हे सुद्धा ठाकरे कुटुंबावर आक्रमक झाल्याचे दिसून आले नव्हते. ठाकरे यांच्याबाबत कोणतीही वैयक्तिक टीका केली जाणार नाही, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी जाहीर केले होते.
त्यानंतर आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना ते बंडखोरांवर टीका करताना दिसून येत आहे. गद्दारांनो, राजीनामा देऊन निवडणूकांना सामोरे जा, असे आव्हान आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांना देत होते. त्यानंतर बंडखोर आमदार आणि ठाकरे कुटुंबाची जुंपली होती.
आदित्य ठाकरेंनी आव्हान दिल्यानंतर काही बंडखोर आमदारही त्यांच्यावर निशाणा साधताना दिसून येत होते. काही ठराविक आमदार आदित्य ठाकरे यांना टार्गेट करत होते. शिंदे यांनी आम्हाला सांगितले तर लगेच आम्ही राजीनामा देऊ असे काही आमदारांनी म्हटले होते.
काही बंडखोर आमदारांनी शिंदेंच्या सुरक्षेवरुन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर काही आमदारांनी आपले मोजके आमदार रोज वादग्रस्त असल्याची तक्रार शिंदेंकडे केली होती. आता शिंदे यांनी बेजबाबदारपणे बोलणाऱ्या आमदारांचे कान टोचल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ जिल्ह्यात शिंदे गटाला भोपळा! शिवसेनेने केला सुपडा साफ
Shivsena: बंडानंतर शिवसेनेचा पहीला विजय; उद्धव ठाकरेंना साथ देत मतदारांनी शिंदेंना दिला दणका
Shivsena: ४२४ किमीचा प्रवास सायकलने करुन उद्धव ठाकरेंना भेटणार कट्टर शिवसैनिक, म्हणाला, ठाकरेंना भेटून…