राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. शिवसेनेकडून वारंवार शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकनाथ शिंदेंनी अचानक बंड पुकारल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक दिवसांपासून नाराज असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये आहे.
शिवसेनेत उभी फूट पडली असून शिंदेंसह जवळपास शिवसेनेचे २५ आमदार गुजरातच्या सुरतमध्ये रातोरात दाखल झाल्याने महाराष्ट्रात मोठा भूकंप झाला आहे. अशातच शिवसेनेने मोठं पाऊल उचलल आहे. शिवसेनेने मोठं पाऊल उचलतं एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावरून उचलबांगडी केली आहे.
तर आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री राजीनामा देणार असल्याची माहिती सध्या हाती येत आहे. यामुळे ठाकरे सरकार धोक्यात येणार असल्याच बोललं जातं आहे. सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना वेग आला आहे.
तर दुसरीकडे अशातच एकनाथ शिंदे यांनी एक सूचक ट्विट केले आहे. बंडखोरीनंतर त्यांचे पहिले ट्विट आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आपण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, तसेच बाळासाहेबांनीच आपल्याला हिंदुत्वाची शिकवण दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमधून असे लक्षात येत आहे की त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे सरकार मान्य नाही. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी इच्छाही त्यांची दिसत असल्याचे ट्विटमधून लक्षात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘…तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता’
बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी प्रतारणा नाही केली- एकनाथ शिंदे
११ वेळा लग्न केलं तरी महिलेला मिळाला नाही मनासारखा जोडीदार, आता म्हणतेय, एखादी व्यक्ती नक्की..
‘धर्मवीर’ मुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये पडली वादाची ठिणगी? राज ठाकरेंचं कनेक्शन आलं समोर