Share

Ashok chavan : “…तेव्हा एकनाथ शिंदेही आले होते” अशोक चव्हाणांनी सत्ता स्थापनेबाबतचं फोडलं राजकीय गुपित!

महाविकास आघाडीत शिवसेनेची कोंडी होत आहे, तसेच शिवसेनेला निधी मिळत नाही असा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य शिवसैनिकांनी बंड केले. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मात्र शिंदे यांनी केलेल्या या आरोपावर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच कोंडीत पकडले गेले आहेत. चव्हाण म्हणाले, भाजप, शिवसेना युती सरकारच्या काळात युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता.

तसेच शिंदे यांचाही त्या शिष्टमंडळात समावेश होता, असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला आहे. तसेच म्हणाले, २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेनेने एकत्र लढवली होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. या घटनेने राजकीय जाणकारांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

मात्र, भाजपसोबत आता राहायचे नाही ही शिवसेनेची भूमिका त्यापूर्वीच म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या काळातच झाली होती. तेव्हा शिवसेनेचे मंत्री आमचा राजीनामा खिशात आहे, असे जाहीर भाषणांमध्येही सांगत होते. युतीसरकामध्ये आपल्याला सन्मान मिळत नाही, अशी तक्रारही शिवसेनेने केली होती, असे अशोक चव्हाण म्हणाले.

पुढे म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करु, अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे नेते आले होते. त्यामध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वांनी माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती, असेही चव्हाण म्हणाले.

तसेच म्हणाले, जेव्हा सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेचे नेते माझ्याकडे आले होते, तेव्हा त्यांना मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करा हे सुचविले होते. पण, नंतर ते पवार यांना भेटले की नाही मला याबाबत माहिती नाही, असे चव्हाण म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now