Eknath Khadse : राज्यात नवे सरकार स्थापन झाले खरे, परंतु वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या एकमेकांवरील टीका सतत सुरूच आहे. यासोबतच ठाकरे-शिंदे वादही कायम वाढतंच आहे. सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्येदेखील सत्ताधारी आणि विरोधी यांचे एकमेकांवर टीकास्त्र सोडणे सुरूच आहे.
यातच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली होती. गुलाबराव पाटील यांनी भाजप – शिवसेना युती तोडणारे एकनाथ खडसे आता शिवसेनेसोबत कसे बसतात, असा प्रश्न करत एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली होती. गुलाबराव पाटलांच्या या टीकेला एकनाथ खडसेंनी सडेतोड उत्तर दिले आहे.
शिवसेना-भाजप युती तोडण्याचा निर्णय हा त्यांचा नव्हता तो भाजपचा सामूहिक निर्णय होता. तसेच यात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते असून या निर्णयाला भाजप केंद्र सरकारची मान्यता होती, असा खुलासा एकनाथ खडसेंनी केला आहे. हा खुलासा करून त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
‘मला भाजप-शिवसेना युती तोडल्याचा आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, युती तोडण्याचा निर्णय आधीच झाला होता. फक्त घोषणा करण्याचे काम आपण केले’ असे एकनाथ खडसे म्हणाले. तसेच, राज्य सरकारची विकास कामे अतिशय संथ गतीने सुरु आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला होता. या आरोपाशी मी सहमत आहे, असेही खडसे म्हणाले.
तसेच राज्य सरकारने विविध विकास कामांना स्थगिती दिल्यामुळे त्याचा परिणाम राज्याच्या विकासावर होत आहे. त्यामुळे विकासकामे नियमित सुरु राहायला हवे. याचे कारण असे की, विकास कामे मंजूर केल्यानंतर ती सुरु होण्यापर्यंत टेंडर प्रक्रिया सुरु व्हायला वेळ लागतो. त्यामुळे वेळेत ही विकास कामे पूर्ण झाली नाहीत तर त्यासाठी मिळालेला निधी परत जाण्याची शक्यता असते. म्हणूनच ही विकास कामे बंद राहायला नको, असे एकनाथ खडसे म्हणाले.
पुढे बोलताना, ट्रकमधील वजन जास्त दाखवून प्रत्येक ट्रकद्वारे हजारो रुपयांची लूट केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या मुक्ताईनगर येथील चेक नाक्यावर ट्रकमधील वजन जास्त दाखवून हजारो रुपयांची लूट केली जाते. तसेच यात परिवहन अधिकाऱ्याचा समावेश आहे, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला.
याप्रकरणी आपल्याकडे तक्रारी आल्यानंतर आपण त्याची चौकशी केली. यावेळी चेक नाक्यावर आपल्याकडून जास्त पैसे घेत असल्याचे ट्रक चालकांनी सांगितले. यात कोणत्या राजकीय शक्तीचा हात आहे याचा शोध घ्यायला हवा, असेही एकनाथ खडसे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
Cricketer: एकेकाळी होता स्टार क्रिकेटपटू, आता रिक्षा चालवून भरतोय पोट, कहाणी वाचून डोळे पाणावतील
security : देशाच्या सुरक्षेलाच नख, मोठा घोटाळा उघड; अनेक बडे अधिकारी अडकणार
आगामी निवडणुकांसाठी दृष्टीने राज ठाकरे ऍक्टिव्ह; नाराज वसंत मोरेंना दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
Shambhuraj Desai : काहीही झालं तरी गद्दार शंभुराज देसाईंना पाडणारच; शिवसेनेच्या वाघाने फोडली डरकाळी